राहूरी फॅक्टरीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी फॅक्टरीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण

राहूरी फॅक्टरी(वेबटीम ) राहूरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील  १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्...

राहूरी फॅक्टरी(वेबटीम)

राहूरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील  १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या आईने राहूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, २६ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सदर मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाकरिता पळवून नेले. याच रात्री अपहरण झालेल्या मुलीच्या आईने राहूरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विठ्ठल राठोड करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत