देवळाली प्रवरा(वेबटीम) आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून आपणांस कळवू इच्छितो की, करोना विषाणूच्या पा...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या माध्यमातून आपणांस कळवू इच्छितो की, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकरीचे झाले आहे. शैक्षणिक संस्था मात्र कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यालायने निर्देश देऊनही शिक्षण संस्था आपल्या शुल्का मध्ये एक रुपयाही कमी करण्यास तयार नाही. ज्या सुविधा गेल्या वर्षभर वापरल्या नाहीत त्या सुविधांचे पण शुल्क मागील वर्षी शिक्षण संस्थांनी वसूल केले. संकटाच्या काळामध्ये शिक्षणासारख्या पवित्र व्यवसायामध्ये सुद्धा संस्था आपण नफा सोडायला तयार नाहीत.
सद्य परिस्थीती आपण जाणता, आज विद्यार्थ्याकडे आणि त्यांच्या पालकांकडे शुल्क भरण्याची आर्थिक क्षमताच नाही. आपण जर शुल्क कमी केले नाही आणि त्याच्याकडे शुल्कासाठी तगादा लावला तर त्याला शिक्षण अर्धवट सोडण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. जर विद्यार्थीच शुल्काअभावी शिक्षण संस्थेत येवू शकला नाही तर संस्था तरी कश्या टिकतील. विद्यार्थी शिकलाच नाही तर या राष्ट्राचे भवितव्य काय असेल?
आपल्याला देखील संस्था चालवण्यासाठी खर्च आहे हे आम्ही जाणतो. मात्र या परिस्थीती मध्ये काही गोष्टींचे आपल्या स्तरावर आपण नियोजन करू शकता, हे आपल्याला मान्यच करावे लागेल. समाजाच्या आणि राष्ट्राच्या भवितव्यासाठी अश्या परिस्थितीत सर्वांनीच पुढे येणे गरजेचे आहे. आपण आपले एक_पाऊल_विद्यार्थ्यांसाठी पुढे करावे. अशी आम्ही आपणांस राज्यातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो.
खालील गोष्टींसंदर्भात आपण सकारात्मक विचार करावा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत आपण आपल्या शिक्षण शुल्कात ( Tuition Fee) सरसकट कपात करावी. त्याचबरोबर विदयार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत (Library, Laboratory, Internet, Development, Gymkhana, Education Tour, Annual Functions, etc.)त्याचे शुल्क आकारू नये.
(फुकटचा, लुबडलेला पैसा सत्कारणी लागत नाही. अश्या प्रकारे फुकटचा पैसा घेऊन आपण समाज व विद्यार्थ्यांपुढे कोणता आदर्श उभा करत आहात. )
ज्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे शुल्क राहिले असेल त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेपासून अथवा शिक्षणापासून वंचित ठेवू नये. तसेच त्याला शाळा- महाविद्यालय सोडण्यास भाग पाडू नये.(विद्यार्थी आज ना उद्या आपले पैसे देणार आहे. तोपर्यंत त्याची महत्वाची कागदपत्रे आपल्याकडेच राहणार आहेत.)
नर्सरी ते १०वी चे शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थानी शैक्षणिक साहित्य (पुस्तके, वह्या इ.) शाळेतूनच घ्यावे लागतील ही सक्ती करु नये. तसेच बोर्डाने (CBSE,ICSE,STATE) जी पुस्तके निर्देशित केली आहेत तीच पुस्तके शिकवताना वापरावीत. दुसऱ्या कोणत्याही प्रकाशनाची महाग पुस्तके पालकांना घेण्यास भाग पाडू नये.(संबंधित बोर्डा कडे तक्रार गेल्यास आपल्यावर कारवाई होऊ शकते)
वरील सर्व मुद्यांचा आपण सकारात्मक विचार करुन योग्य प्रतिसाद द्याल हि अपेक्षा. अन्यथा आम्हाला विद्यार्थ्यांच्या हितासाठी नाईलाजास्तव आपल्या विरोधात लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, देवळाली प्रवरा ऋषिकेश संसारे यांनी केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत