नेवासा : तालुका प्रतिनिधी नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील एफ.जे.एफ.एम. हॉस्पिटल वडाळा मिशन या स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामाणिक...
नेवासा : तालुका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील एफ.जे.एफ.एम. हॉस्पिटल वडाळा मिशन या स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामाणिक रुग्णसेवा देत असलेल्या सेवाभावी संस्थेस विनाकारण बदनाम करून त्यांच्याविरोधात आंदोलन छेडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये काही काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश असून याला आपला विरोध असल्याचा खुलासा जिल्हा काँग्रेस कमिटीचे (एस सी विभाग) जिल्हाध्यक्ष राजेंद्र रत्नाकर वाघमारे यांनी केला आहे.
या संदर्भात नेवासा तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दिनांक ९ मे रोजी गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून संबंधित आरोपींना अटक केली होती. यासंदर्भात काही वृत्तपत्रांमधून विविध बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात शहानिशा व खात्री करण्यासाठी एफ.जे.एफ.एम. हॉस्पिटल वडाळा मिशन या सेवाभावी संस्थेस आम्ही भेट दिली. सदर संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून अविरत व प्रामाणिक रुग्णसेवा करत आली आहे. याच सेवेचा भाग म्हणून तसेच एक सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन संस्थेस संलग्न कोविड सेंटर उभारण्यात आले होते व त्या माध्यमातून रुग्णसेवा देण्यात आली.
oogle = window.adsbygoogle || []).push({});परंतु मध्यंतरी झालेल्या छापा प्रकरणात या संस्थेचा रेमडेसीविर इंजेक्शन प्रकरणाशी कुठलाही संबंध नसताना या सेवाभावी संस्थेस बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात आले आहे. एफ.जे.एफ.एम. हॉस्पिटल व तेथील औषधी भांडार याविषयी चुकीची माहिती प्रसारित होत आहे ही बाब न्याय्य नाही.
सदर हॉस्पिटल व तेथील औषधी भांडार याविरुध्द विनाकारण आंदोलन छेडून त्यांना वेठीस धरले जात असेल तर त्यास जिल्हा काँग्रेस कमिटी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष या नात्याने आपण मुळीच सहमत नसल्याचा खुलासा राजेंद्र रत्नाकर वाघमारे यांनी निवेदनात केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत