राहूरी फॅक्टरी(ऋषी राऊत) वाढदिवस हा प्रत्येकाचा आनंदाचा क्षण असतो, परंतु या क्षणी कुठले तरी सामाजिक कार्य आपल्या हातून घडावे आणि आपला ...
राहूरी फॅक्टरी(ऋषी राऊत)
वाढदिवस हा प्रत्येकाचा आनंदाचा क्षण असतो, परंतु या क्षणी कुठले तरी सामाजिक कार्य आपल्या हातून घडावे आणि आपला जन्मदिवस शुभ होवो हीच मनोमनी भावना व्यक्त करून राहुरी फॅक्टरी येथील साईराज प्रतिष्ठाणचे प्रतीक जाधव यांनी आपला वाढदिवस कोविड सेंटर परिसरात साजरा करून आगळी वेगळी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
देवळाली प्रवरा येथील सहारा शासकीय कोविड सेंटर मध्ये जाऊन प्रतीक जाधव याचा वाढदिवस मित्र परिवारांनी टरबूज कापून साजरा केला.एवढ्या वरच न थांबता आपल्या जन्मदिनी काहीतरी समाजाप्रति उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन सहारा शासकीय कोविड सेंटर साठी १०० मास्क व सॅनिटाइझर भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
खरतर वाढदिवस मित्रांसमवेत साजरा न करता एक आगळी वेगळी सामाजिक बांधिलकी प्रतीक जाधव व मित्र परिवाराने जोपासल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी अमजद इनामदार, सिस्टर पूनम भोसले, ऋषि राऊत, विठू राऊत, आशु सांगळे,किरण गाढे,कृष्णा शिवले, तुषार राऊत, पवन गाढे, सुरज कोठुळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते..


कोणत्याही टिप्पण्या नाहीत