तर, 32 गावात ' त्या' नेत्यांना फिरकू देणार नाही: अनिल पाटील शिरसाठ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तर, 32 गावात ' त्या' नेत्यांना फिरकू देणार नाही: अनिल पाटील शिरसाठ

राहुरी : प्रतिनिधी        तालुक्यातील विस्थापित 32 गावातील  जनतेचे  COVID -19  या परिस्थितीला प्रचंड हाल चालू  आहे,  अशा संकट काळात...


राहुरी : प्रतिनिधी   


   
तालुक्यातील विस्थापित 32 गावातील  जनतेचे  COVID -19  या परिस्थितीला प्रचंड हाल चालू  आहे,  अशा संकट काळात दुर्लक्ष केलेल्या नेत्यांना या भागात फिरू देणार नाही, असा इशारा राहुरी बाजार समितीचे मा. संचालक श्री अनिल पाटील शिरसाठ यांनी एका पत्राद्वारे दिला आहे

.

शिरसाठ म्हणाले की,  राहुरी मतदार संघाच्या विभाजनानंतर राहुरीचे 32 गावे श्रीरामपूर मतदार संघात जोडले गेले, ही 32 गावे विधानसभेला श्रीरामपूर आणि लोकसभेला शिर्डी मतदार संघात मोडतात. मात्र, नेतृत्वाभावी या 32 गावावर अन्याय सुरू आहे, सध्या कोव्हिडं काळात येथील जनतेला ना स्थानिक आमदार, ना खासदार, ना कुणी मंत्री विचारण्यास तयार आहे, त्यामुळे येथील 32 गावातील जनता वाऱ्यावर आहे.

 सध्या कोव्हिडं काळात लोकप्रतिनिधीच्या मदतीची जनतेला गरज आहे.  मात्र, रामपूर ते मांजरी पर्यंत कुठेही वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. सर्वच नेते रेमेडीसीवर  व लसी बाबत  नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे कोणाकडे तक्रार करावी, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहेत, आपण या कामी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना याबाबत पत्र लिहून सर्व माहिती देणार असल्याचे श्री अनिल पाटील शिरसाठ यांनी म्हटले आहेत.

आगामी  होणाऱ्या सर्वच निवडणूकीमध्ये आपण या कामी जनजागृती करुण  covid-19 च्या काळात दुर्लक्ष केलेल्या नेत्यांना या भागात फिरून देणार नाहीत. यासाठी 32 गावातील युवकांची एक  फळी निर्माण करण्याचा मानस शिरसाठ यांनी  व्यक्त केला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत