श्रीरामपूर : प्रतिनिधी वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ यांच्यावती...
श्रीरामपूर : प्रतिनिधी
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघ यांच्यावतीने सालाबादप्रमाणे समाजाच्या विविध क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा " वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड " देऊन सन्मान केला जातो. तसाच सन २०२१ या वर्षात देखील केला जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन वर्ल्ड पार्लमेंट महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष तथा डब्लयूसीपीएचे राष्ट्रीय मिडीया समन्वयक डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे.
कला, क्रिडा, साहित्य, पत्रकारीता, संशोधन, सामाजीक, गिर्यारोहण, वैद्यकीय, औद्योगिक, अभियांत्रीकी, पर्यावरण, रक्षा - सुरक्षा, ऐतिहासिक संग्रह, संगित, चित्रकारिता तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्या व्यक्ती आपला प्रस्ताव ३१ मे २०२१ अखेर (डब्ल्यूसीपीएएसएचआरआय आरएएमपीयूआर अॅटदि रेट जीमेल. कॉम wcpashrirampur@gmaiI.com या मेल आयडीवर पाठवू शकतात. सोबत पासपोर्ट फोटो, बायोडाटा, व आपल्या कार्याची माहीती पाठवावी. तसेच ९०९६३७२०८२ या मोबाईल नंबरवर संपर्क करावा. कृपया व्हॉट्सपवर प्रस्ताव पाठवू नये, या पुरस्कारात मानपत्र, सन्मानचिन्ह व वर्ल्ड पार्लमेंटचे सदस्यत्व दिले जाणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत