राहुरी/प्रतिनिधी कोरोना लसीकरणआधी आता कोविड अॅन्टिंजन चाचणी करण्यास प्रारंभ झाला आहे.तालुक्यातील मानोरी आरोग्य उपकेंद्र अंतर्गत ही मोहीम आत...
राहुरी/प्रतिनिधी
कोरोना लसीकरणआधी आता कोविड अॅन्टिंजन चाचणी करण्यास प्रारंभ झाला आहे.तालुक्यातील मानोरी आरोग्य उपकेंद्र अंतर्गत ही मोहीम आता यशस्वीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभाग सरसावले आहे. येथील समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.स्वाती देसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक सुनिल पोंदे,आरोग्य सेविका सुनिता माने ,डॉ.महेश आढाव,आशा सेविका वैशाली थोरात, स्वाती तनपुरे, सुनिता आढाव,मुक्ता पोटे, सरपंच आब्बास शेख,पोलिस पाटील भाऊराव अढाव,ग्रामविकास अधिकारी मुरलिधर रगड,तलाठी राहुल क-हाड आदिकमिटी यांच्याकडून हि योजना राबविण्यासाठी सकाळपासून सुमारे दिडशे व्यक्तींना भ्रमणध्वनीद्वारे नोंदणी करून घेतली सदर नोंदणी झाल्यानंतर रविवारी पन्नास व्यक्तींना मांजरी येथील आरोग्य केंद्रात या तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे...तेथेच त्यांचा तपासण्या करण्यात आल्या असुन तीन दिवसांनी त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावरच निगेटिव व्यक्तींनाच कोरोनाची लसीकरण केले जाईल असं वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.आता कोविड लसीकरणाआधी कोरोना चाचनीचा शासनाने घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आता कोरोना संक्रमित व्यक्ती ही लसीकरणा वेळी नागरिकांच्या तसेच आरोग्य विभागाच्या देखील व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही त्यामुळे आता मोठा धोका टाळण्यास देखील मदत होणार असल्याचे आरोग्य विभागाकडुन सांगण्यात आलं आहे.
मानोरी येथील मतदार यादीनुसार सकाळपासून गावातील कुटुंब प्रमुखांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला त्यामधून सुमारे पन्नास व्यक्तिंच्या तपासण्या पूर्ण केल्या आहेत कोरणा लसीकरण आधी करण्यात आलेल्या या तपासण्या आता पूर्णपणे सुरक्षित वाटत आहेत. त्यामुळे संक्रमित व्यक्ती ही वैद्यकीय अधिकारी कर्मचारी किंवा गर्दीत आढळून येणार नाही त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ वाटते. - स्वाती देसले,समुदाय वैद्यकीय अधिकारी
लसीकरणाआधी आता अॅटेजन टेस्ट करायला मानोरी गावातून सुरूवात करण्यात आली आहे.तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आमची कमिटी काम करत आहेत. सकाळपासून कमिटी व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत सुमारे दोनशे व्यक्तींना फोन करून मांजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. त्या पैकी पन्नास व्यक्तींचे चाचण्या पुर्ण करण्यात आल्या आहेत - भाऊराव आढाव, पोलीस पाटील मानोरी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत