देवळाली प्रवरा(वेबटीम) येथील शासकीय कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी समाजातील विविध दानशूर मंडळींच्या मदतीचा हात पुढे येत असून कोरोना रुग्णांच...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
येथील शासकीय कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी समाजातील विविध दानशूर मंडळींच्या मदतीचा हात पुढे येत असून कोरोना रुग्णांची सेवा करत आहे.
कोरोना रूग्णांची सँख्या वाढत असल्याने देवळाली प्रवरा व परिसरातील ३२ गावातील नागरिकांसाठी येथील सहारा लॉन्स येथे २२ एप्रिल रोजी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. आ.लहू कानडे यांच्या हस्ते व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.पहिल्याच दिवशी तब्बल २४ कोरोना रूग्ण विलगिकरण कक्षात उपचारासाठी दाखल झाले. या ठिकाणी सरकारी डॉक्टर व स्थानिक डॉक्टर तसेच नर्स रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्रालयातील सेवानिवृत्त सचिव व सामाजिक कार्यकर्ते दत्ता पाटील कडू यांनी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी आवाहन केल्यानंतर नेवासा येथील प्रफुल्ल म्हस्के यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आरो सिस्टीम, प्रफुल्ल चोरडिया यांनी टी व्ही संच, अशोक तनपुरे २ कॅरेट पपई.
संतोष मुथ्था यांनी १५ किलो संत्री, ऋषिकेश संसारे व जगदीश ढुस १०० अंडी,मोहसीन इमानदार एक कॅरट पपई,मराठा ग्रुपच्यावतीने ५ टरबूज कॅरेट, उत्तम मेडीकल यांच्यावतीने आरोग्य कर्मचारांना मास्क ग्लोव्हज सुरक्षा कीट, संजय सिनारे , ज्ञानेश्वर खरात इलेक्ट्रीकल यांनी प्लंबिग सेवा मोफत दिली. आकाश चाबुकस्वार दोन कॅरट अंडी दिली. विजय जोशी(गुरू) यांनी १०० बिस्किटे याप्रमाणे मदत केली .
समाजातील दानशूर मंडळींनी कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी अमजद इनामदार (मो.8806888998) यांच्याशी संपर्क करावा.
शासकीय कोविड सेंटरमधील रुग्णांना योगासनाचे धडे देण्यात आले. शासकीय सेंटरमध्ये ५० रूग्ण उपचार घेत असून औषधोपचार बरोबर येथील डॉ. कोमल ढुस तसेच नर्स पूनम यादव यांनी योगासनाचे धडे दिले. यावेळी सततच्या आरामातून कंटाळलेल्या रुग्णांना या अनोख्या उपक्रमामुळे उत्साह आला होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत