कोरोना काळात योगा प्राणायामाद्वारे साधकांमध्ये फुंकले नवचैतन्य - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोरोना काळात योगा प्राणायामाद्वारे साधकांमध्ये फुंकले नवचैतन्य

अहमदनगर(वेबटीम) मागील वर्षांपासून कोरोना सारख्या महामारीमुळे आज कित्येक लोक आपले प्राण गमवत आहेत आजही बरेच जण या संसर्गजन्य आजाराशी आपल...

अहमदनगर(वेबटीम)

मागील वर्षांपासून कोरोना सारख्या महामारीमुळे आज कित्येक लोक आपले प्राण गमवत आहेत आजही बरेच जण या संसर्गजन्य आजाराशी आपल्या सर्व ताकदीनिशी लढत असतांना दिसत आहेत .या सर्वासाठी ' संजीवनी 'औषधाच्या रूपाने जनतेच्या कामी येत आहे ती म्हणजे "योग,प्राणायाम आणि ध्यानशिबीर ".

श्री प्रकाश  बडजाते हे सलग तीनशे दिवसापासून साधकांचे योग, प्राणायाम व सुदर्शन क्रियेचा लाभ घेत आहेत आणि सराव अगदी न चुकता घेत आहेत आणि आज या सरावाला तीनशे दिवस पूर्ण झाले आहेत.भारताबरोबरच परदेशातूनही साधक या संधीचा लाभ घेत आहेत.आज पर्यंत हजारो साधकांनी या सेवेचा उपयोग करून आपले शरीर निरोगी आणि कोरोनाशी लढण्यासाठी मजबूत बनवले.

आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल टीचर व मिनिस्ट्री ऑफ आयुष्य च्या योगा ट्रेनर शिक्षिका सौ रचना सदाफुले /फासाटे अगदी परदेशातून म्हणजे हजारो किलोमीटर दूर असलेल्या मोरोक्को या देशातून आपल्या देशावरील आणि साधकांच्या प्रेमापोटी यांनी सामाजिक सेवेचा जणू विडाच उचलला आहे. त्याही नियमित ऑनलाईन कोर्सेस आणि योग प्राणायाम शिबीर आयोजित करून लोकांना योगाचे कोरोना काळात महत्व पटवून देतात आणि साधकांचे मनोबल वाढवण्यासाठी मदत करतात. कोरोना काळात योग, प्राणायाम आणि ध्यान धारणेचे काय महत्व आहे?


आजच्या या बिकट परिस्थिती मध्ये कोरोना पासून आपले संरक्षण करायचे असेल तर योग आणि प्राणायामची अत्यंत गरज का आहे हे आपण समजावून घेऊ. एकाच जागेवर बसून बैठे काम शरीराची हालचाल होऊ देत नाही.शरीराची न होणारी हालचाल मग सर्व रोगांचे कारण बनू लागते.आणि त्यामुळे अपचन, वजन वाढणे, बीपी वाढणे अशा विविध प्रकारच्या आजारांना सुरवात होते.आज प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती ही आहार, ताण तणाव व आणि हवेतील प्रदूषण  या मुळे कमी होत चालली आहे.


योग प्राणायाम आणि ध्यान धारणा यांचा शरीरावर होणारा सकारात्मक परिणाम :आपल्या भारतीय संस्कृतीत हजारो वर्षा पासून निरामय आरोग्य कसे ठेवता येईल यावर अध्ययन केले गेले आणि ग्रंथ स्वरूपात मांडून ठेवले.तुम्हाला विशेष वाटेल त्या वेळी भारत भूमी ही एकमेव अशी भूमी होती जेथे योगासारखे ज्ञान उपलब्ध होते.


योग म्हणजे 'मिलाप' होणे, जुळणे.

योगामुळे शरीरातील आंतरिक हालचाली होऊन शरीर योग्य प्रमाणात तानले जातेआणि सैल सोडले जाते आणि त्याचा फायदा शरीरातील प्रत्येकअवयवाला आणि पेशीना मिळतो.योगामुळे शरीर लवचिक बनते. शरीरात नवीन ऊर्जा तयार होते आणि थकवा ताण तणाव दूर होतो.योगामुळे शरीर, मन, आणि विचार यांच्यावर नियंत्रण आणले जाते.या सर्वांचे एकाच लयीमध्ये असणे म्हणजेच 'योग '.

प्राणायाम :आपण प्रत्येक जण श्वास घेतो. आपला श्वास म्हणजेच आपला प्राण श्वास बंद झाला तर आपण जिवंत राहू शकत नाही हे सर्वांना माहित आहेच. आज कोरोना मुळे बहुतेक श्वास घेऊ शकत नसल्यामुळे मरण पावत आहे शरीरातील ऑक्सीजन लेवल कमी होत आहे. जर प्रत्येकाने रोज विविध प्राणायाम केली तर नक्कीच सर्व जण याचा सामना करू शकतील.


प्राणायाम म्हणजे (प्राण +आयाम )

म्हणजे आपण जो श्वास घेतो तो एका विशिष्ट लयी मध्ये घेणे, त्या लयीमध्ये जाणीवपूर्वक बदल करणे आणि जास्त प्रमाणात ऑक्सिजन शरीरात घेणे. यामुळे आपल्या शरीराला भरपूर ऑक्सिजन मिळतो व शरीरातील प्रत्येक अवयवला तो रक्तामार्फत दिला जातो.आपण आपल्या क्षमतेच्या फक्त तीस टक्केच ऑक्सिजन आपल्या फुफुसा द्वारे घेतो त्यामुळे प्राणायामाने आपल्या फुफुसाला सुद्धा व्यायाम मिळतो.

प्राणायामाचे अगणित फायदे आहेत.

संपूर्ण शरीर नेहमी निरोगी राहते.सर्व आजार दूर व्हायला सुरवात होते.प्रतिकार शक्ती वाढते. प्राणायामामुळे सकारात्मक विचार बनतात. मन सदैव आनंदी आणि वर्तमानात राहते.प्राणायामा मुळे ताण तणाव दूर होतो.आणखीही खूप फायदे प्राणायामामुळे सांगता येईल.

ध्यान धारणा :

जसे योगा आणि प्राणायाम शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे तसेच ध्यान हे आपल्या मनाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.जसे आपल्या शरीराला झोपेची गरज असते त्याच प्रमाणे मनाला ध्यानाची गरज असते. ध्यानामुळे मन ताजेतवाने होते. आणि वर्तमानात राहते

योगसूत्र हे सांगते की तुम्ही आनंदी तेव्हाच राहू शकता जेव्हा तुमचे मन हे वर्तमानात असते. तुम्ही जेव्हा दुःखी, चिंताग्रस्त किंवा काळजी करता त्या वेळी मन वर्तमानात नसते आणि मन जेव्हा भूतकाळात असते तेव्हा ते पच्याताप, स्वतःला दोष देते आणि जेव्हा भविष्यात असते तेव्हा काळजी, चिंता करते. मनाच्या या अवस्थेमुळे आपल्या शरीरावर परिणाम होतात आणि त्यामुळे शरीरात विविध आजाराला सुरवात होते, म्हणजेच आपल्या मनाची स्थिती आपले आरोग्य ठरवते. या साठी ध्यान धारणा आवश्यक आहे.


आजच्या लॉकडाउन च्या काळात हजारो लोक मोफत ऑनलाईन योग प्राणायाम शिबीर करत आहे.ज्यांना हया शिबिरात भाग घ्यायचा असेल त्यांनी भरत बाटिया-7588605248, विजय सूर्यवंशी-986011909, किशोर थोरात 9657208656 संपर्क करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत