राजेंद्र उंडे(देवळाली प्रवरा) विघ्नहर्ता कोविड सेंटर मध्ये रुग्णांचे मनोबल वाढवल्याने कोरोना रुग्णांची आजारा पणातून बरे होण्याचे प्रमाण वाढल...
राजेंद्र उंडे(देवळाली प्रवरा)
विघ्नहर्ता कोविड सेंटर मध्ये रुग्णांचे मनोबल वाढवल्याने कोरोना रुग्णांची आजारा पणातून बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.कोरोना आजाराने रुग्णांचे मनोधर्य खचले जाते. या कोविड सेंटर मध्ये रुग्णांचे मनोधर्य वाढविल्याने रुग्ण लवकर बरा होत आहे.असे प्रतिपादन प्रांतधिकारी अनिल पवार यांनी केले.
श्रीरामपूर येथील संगमनेर रोड लगत वसंत बहार मंगल कार्यालयात डाँ.प्रमोद गाडे, डाँ.सुशिल गाडे,डाँ.नयन ठोंबरे, दिपक उघडे आदींनी विघ्नहर्ता कोविड सेंटर सुरु केले.या कोविड सेंटर मध्ये 18 ते 25 एच आर सी टी असणाऱ्या रुग्णांवर एक ते दोन रेमडीसीवर वापरुन रुग्णांना बरे करण्यासाठी विघ्नहर्ताच्या वैद्यकीय पथकाने यश मिळविले आहे. यावेळी रुग्णांचे मनोधर्य वाढवून कमी दिवसात रुग्णांना बरे करण्यातआले.ज्या रुग्णांनी डाँक्टरचे ऐकून मनाची तयारी केली की या आजारातून बरे होणार आहे असेच रुग्ण लवकर बरे होतात. त्यामध्ये राजन दहिवाल, वत्सलाबाई कदम, केशव काळे,सुरेश जगताप,सुरेश पवार आदींचा प्रांतधिकारी पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रांतधिकारी पवार म्हणाले की,कोरोनावर उपचार घेताना मनाची चिलबिचल पहिली थांबवली पाहिजे. प्रत्येक रुग्णांने निश्चय केला पाहिजे की, मी कोरोनाला हरवणार असा मनातून निश्चय केला तर त्यावेळी बऱ्या प्रमाणात रुग्ण कोरोनावर मात करतो.वैद्यकीय उपचार करताना रुग्णांचे मनोधर्य वाढवणे गरजेचे आहे.हेच विघ्नहर्ता कोविड सेंटर मधील डाँक्टर यांनी केल्याने अनेक रुग्ण कमी खर्चात बरे होवून बाहेर पडले आहेत. असे प्रांतधिकारी पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन दिपक उघडे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत