विना क्रमांकांच्या गाड्या आढळल्यास जप्त करणार,पो.नि.नंदकुमार दुधाळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विना क्रमांकांच्या गाड्या आढळल्यास जप्त करणार,पो.नि.नंदकुमार दुधाळ

  राहुरी /प्रतिनिधी   राहुरी तालुक्यामध्ये विना क्रमांकांच्या  दुचाकी -चारचाकी आढळून आल्यास त्या जप्त करणार आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरिका...

 राहुरी /प्रतिनिधी 


 राहुरी तालुक्यामध्ये विना क्रमांकांच्या  दुचाकी -चारचाकी आढळून आल्यास त्या जप्त करणार आहे.त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आपल्या गाड्यांची नोंदनी करून गाड्यांना नंबर प्लेट लावाव्यात अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी दिला आहे.


सध्या राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विना क्रमांकाच्या गाड्या आढळून येत आहे.त्यामुळे विना नंबरच्या दुचाकी रस्त्यावर आढळल्यास त्या जप्त करुन, मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. 


प्रादेशिक परिवहन विभागाकडून दुचाकीचा नंबर घेतल्याशिवाय जप्त केलेल्या दुचाकी सोडल्या जाणार नाहीत आणि या कारवाईत कुणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही. त्यामुळे नागरिकांनी विना नंबरची वाहने रस्त्यावर चालवूच नयेत असे आवाहन देखील पो.नि. दुधाळ यांनी केले आहे. 

त्यामुळे आता  विना क्रमांक रोजरोज फीरणा-या गाडी चालकावरांवर नक्कीच अटकाव होईल अन्  गुन्हेगारीला देखील यानिमित्ताने मोठा चाप बसेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत