१ जुन नंतर टप्प्याटप्प्याने अनलाॅक,ना.तनपुरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

१ जुन नंतर टप्प्याटप्प्याने अनलाॅक,ना.तनपुरे

राहुरी/प्रतिनिधी  महाराष्ट्र शासन ग्रामविकास माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यासाठी ४५ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत, राहुरी तालुक्यातीलवांबोरी,उ...

राहुरी/प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासन ग्रामविकास माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यासाठी ४५ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत, राहुरी तालुक्यातीलवांबोरी,उंबरे,म्हैसगाव,टाकळीमियाॅ आणि गुहा या पाच आरोग्य केंद्रांसाठी या पाच नवीन आद्यावत रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत.त्यामुळे आता आरोग्य व्यवस्थेसाठी याचा निश्चित चांगला उपयोग होईल असे गौरगद्गार आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी काढले आहेत. 

    शुक्रवारी सायंकाळी राहुरी पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये या नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.यावेळी तनपुरे यांनी सांगितले की,आता महाराष्ट्र मध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी काहीशी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे एक जून नंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा आढावा मुख्यमंत्री महोदय हे घेणार आहेत आणि एक जून नंतर हा सर्वच ठिकाणी हळूहळू अनलॉक ची प्रक्रिया सुरू होईल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोणाच्या कठीण प्रसंगात सर्वांनी सहकार्य करून जी मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार देखील तनपुरे यांनी यावेळी व्यक्त करत पुढील काळात देखी सर्व खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

      याप्रसंगी पंचायत समिती  सभापती बेबीताई सोनडर,उपसभापती प्रदिप पवार,मा.उपसभापती रवींद्र आढाव,मनिषाताई ओहोळ, सुरेश निमसे,बाळासाहेब लटके, भाऊसाहेब लोंढे,निलेश राऊत ,संतोष आघाव,भाऊसाहेब लोंढे,मराठा महासंघाचे संभाजी तहातोंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी अनंत परदेशी,तालुका आरोग्य अधिकारी दिपाली गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी,कर्मचारी आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत