राहुरी : प्रतिनिधी तालुक्यातील पत्रकार, शिक्षक,औषधविक्रेत्यांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व विक्रेते यांचे तात्काळ लसीकरण करावे...
राहुरी : प्रतिनिधी
तालुक्यातील पत्रकार, शिक्षक,औषधविक्रेत्यांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व विक्रेते यांचे तात्काळ लसीकरण करावे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस,सुरेश अप्पा निमसे,राहुरी पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप पवार,माजी उपसभापती बाळासाहेब लटके,माजी उपसभापती व गटनेते रवींद्र आढाव यांनी प्रांताधिकारी डॉ दयानंद जगताप व तहसीलदार शेख यांच्याकडे केली आहे.
प्रांताधिकारी डॉ दयानंद जगताप व तहसीलदार शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
राहुरी शहरासह तालुक्यात माजी खासदार प्रसाद तनपुरे व नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण नियोजनपूर्वक सुरू आहे. सदर लसीकरनात आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांचे लसीकरण करावे.पत्रकारांना वृत्ताकणासाठी कोविड सेंटर, विविध कार्यालयांबरोबरच सर्वत्र जावे लागते त्यामुळे प्राधान्याने पत्रकार बांधवांचे लसीकरण करण्यात यावे.त्याबरोबरच अत्यावश्यक सेवेचा अविभाज्य भाग असलेले वृत्तपत्र विक्रेते,औषध विक्रेते,किराणा दुकानदार,दुधसंकलन चालक व त्यांचे कर्मचारी,बँक व पतसंस्था यांचे कर्मचारी,कृषी सेवा केंद्र चालक,सफाई कर्मचारी सर्वांचा फ्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश करून वरील सर्वांचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी करण्यात आली.या वेळी तहसीलदार शेख व प्रांताधिकारी डॉ दयानंद जगताप यांचेशी सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत