ना.गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान ; पहा हा व्हिडीओ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ना.गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान ; पहा हा व्हिडीओ

नागपूर : वेबटीम       सध्या कोरोना काळ भयानक आहे. यात पंथ, पक्ष, धर्म, जात विसरून सध्या रुग्णांना मदत करा. थोडी मदत केली तर बोर्ड आणि झेंडे...



नागपूर : वेबटीम   


 
 सध्या कोरोना काळ भयानक आहे. यात पंथ, पक्ष, धर्म, जात विसरून सध्या रुग्णांना मदत करा. थोडी मदत केली तर बोर्ड आणि झेंडे लावायची गरज नाही. सेवेचे राजकारण करणे लोकांना तसेही आवडत नाही. कोणताही पक्षभेद न करता सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्या. लोक ही सेवा लक्षात ठेवतील, अशी कोपरखळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांना लगावली. 

 शनिवारी भाजप महानगर कार्यकारिणी बैठकीच्या सांगताप्रसंगी केले. ऑनलाइन ही बैठक झाली. यावेळी गडकरी म्हणाले,  माझ्यात अँटीबॉडिज तयार आहेत. मला काही होत नाही, अशा फाजिल आत्मविश्वासात राहू नका. आपला प्रत्येक कार्यकर्ता देवदुर्लभ आहे. त्यांना गमावून चालणार नाही. देशकार्य होईल, मात्र आधी स्वत:ची काळजी घ्या, अशी माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, असे गडकरी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस नुकतेच गडचिरोलीला जाऊन आले. खूप गरजेचे असेल तर जायला हवे, मात्र गाडीत किती लोक बसतात, लोकांमध्ये किती मिसळायचे याचा फेरविचार करावा. महापौर दयाशंकर तिवारी, मोहन मते हे आपल्याला काही होणारच नाही या अविर्भावात वावरत होते. तसे करू नका, अशी सूचना गडकरींनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत