राहुरी : प्रतिनिधी समाजसेवा ही उपजत लागते.परंतु त्याचा दिखावा करणारे अनेक जन पाहीलेत ,परंतु बालवयातच समाजाप्रति असणारी तळमळ राहुरीतील द...
राहुरी : प्रतिनिधी
समाजसेवा ही उपजत लागते.परंतु त्याचा दिखावा करणारे अनेक जन पाहीलेत ,परंतु बालवयातच समाजाप्रति असणारी तळमळ राहुरीतील दोन बालकांमध्ये पहावयास मिळाली. आ. लंके यांनी सुरू केलेल्या कोव्हिडं सेंटरमधील रुग्णासाठी या दोन चिमुरड्या राहुरीकरांनी आपले खाऊचे पैसे देऊन एक आगळा वेगळा आदर्श दाखवून दिला आहे. यावेळी निरागस मुलांच्या मदतीने आ.लंके यांच्यासह उपस्थितांना भारावून आले होते.आमदार लोकनेते निलेशजी लंके यांनी आपल्या परोपकारी कार्यामुळे अल्पावधीतच महाराष्ट्रातील लाखो जनतेच्या मनात एक सामान्यांचा आमदार म्हणून वेगळेपन सिद्ध केले आहे. त्याचाच प्रत्येय मा.शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदीर भाळवणी येथे दिवसभर अनुभवयास मिळतो.
राहुरी येथील दोन बालकांनी आपल्या पालकांजवळ असा हट्ट केला की, आपल्या घरातील धान्यापैकी १ पोते धान्य व साठवून ठेवलेले खाऊचे पैसे लंके साहेबांच्या या सामाजीक कार्यासाठी द्यावे व या दोन बालकांनी ते धान्य व खाऊचे पैसे भाळवणी येथील आरोग्य मंदिरात येऊन आमदार निलेशजी लंके यांच्याकडे सुपूर्द केले .
या वयातही सामाजीक दायीत्व असनाऱ्या व हृदयापासून समाज सेवेची तळमळ असणाऱ्या या बालकांचे आमदार निलेश लंके यांनी जवळ घेत कौतुक केले व तरुणाईने या बालकांचा बोध घेऊन समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न करावा असे सूचित केले .
याला काय म्हणावं
लोकप्रियता, विश्वासार्हता की प्रेम.....
चि.ओम धोंगडे हा स्वतःच्या खाऊच्या पैशातून भाळवणी येथे पारनेर तालुक्याचे नव्हे तर महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटर ला अन्न धान्यांची मदत करणारा राहुरीकर..!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत