प्रा.विजय कापसे यांना सरपंच सेवा संघाचा शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रा.विजय कापसे यांना सरपंच सेवा संघाचा शिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार

कोपरगाव प्रतिनिधी  सरपंच  सेवा संघ  महाराष्ट्र  राज्य यांच्यावतीने प्रा. विजय शिवाजी कापसे यांना शिक्षक भूषण या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्म...

कोपरगाव प्रतिनिधी

 सरपंच  सेवा संघ  महाराष्ट्र  राज्य यांच्यावतीने प्रा. विजय शिवाजी कापसे यांना शिक्षक भूषण या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच  सेवा  संघ महाराष्ट्र राज्याचे  सरचिटणीस  बाबासाहेब पावसे  यांनी  दिलेल्या  प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले  आहे.

       संपूर्ण  महाराष्ट्रात  कार्यरत असलेल्या  सरपंच  सेवा संघाचे  राज्यभरात  तब्बल  २० हजार  सरपंच  सभासद असून या माध्यमातून  सरपंच  सेवा  संघ  राज्यभरातील गाव विकासासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात त्यांचा अजून उत्साह वाढवा या साठी महाराष्ट्र  प्रदेश  च्या  वतीने समाजातील विविध  क्षेत्रात  उल्लेखनीय  कार्य करणाऱ्या  व्यक्तीना  दरवर्षी  सन्मानीत  करण्यात  येत असते, त्याच अनुषंगाने  कोपरगांव  तालुक्यातील  शैक्षणिक  क्षेत्रात गेल्या अनेक  वर्षापासून कार्यरत  असलेले  बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेचे प्रा विजय शिवाजी कापसे करंजी बु  यांना  या वर्षीचा  शिक्षण  क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षक भूषण २०२०-२१ हा राज्यस्तरीय पुरस्कार  जाहीर झाला असून पुढील महिन्यात विविध मान्यवरांच्या शुभहस्ते कोल्हापूर येथे होणाऱ्या  दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. कापसे  यांनी  गरीब कुटूंबातून  येऊन  आपल्या  हुशारी  व  कष्टाच्या  जोरावर अल्पावधीतच    समाजात आपल्या  कार्याचा  एक  वेगळा ठसा उमटवला असून समाजात आपल्या कामाची  दिशा  कर्तृत्व  सिद्ध करून  दाखवले असून ते शिकवत असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचे अनेक विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून नाशिक, शिर्डी, अहमदनगर, पुणे, मुंबई, अहमदाबाद, महाबळेश्वर, सापुतारा,  गोवा अशा अनेक मोठ्या शहरात तर दुबई, सिंगापूर, मलेशिया, इंग्लड या देशातील मोठं मोठ्या पंचतारांकित हॉटेल मध्ये मोठ्या पदावर कार्यरत असून  काहींनी तर स्वतःचा हॉटेल व्यवसाय देखील सुरू केला आहे. तसेच आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्यांचा एक ना अनेक शैक्षणिक क्षेत्रातील  कार्याची दखल घेत लोककलावंत  सांस्कृतिक  मंच मुबई  यांच्या वतीने २०१६  या  वर्षीच्या  आदर्श  शिक्षक पुरस्काराने गौरव झाला आहे. प्रा कापसे हे पत्रकार देखील आहे त्यांनी अल्पावधीतच  पत्रकारिता क्षेत्रात देखील  उत्कृष्ट करत आहे.


त्यांचा निर्भीड पत्रकारीतेबद्दल कोपरगावचे तहसीलदार यांच्या कडून व ओम साई ग्रामिण शिक्षण संस्था कोपरगाव यांच्या तर्फे कोरोना काळात ते करत असलेल्या आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवेबद्दल कोविड योद्धा या पुरस्काराने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.  सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले कापसे हे अगदी कमी वयात  शैक्षणिक सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याने सर्वांच्या परिचयाचे झाले आहे.

     प्रा कापसे  यांच्या  निवडीबद्दल  कोपरगाव चे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, दैनिक लोकमंथन चे मुख्य संपादक अशोक सोनवणे, रयत शिक्षण संस्थेचे कौन्सिल सदस्य कारभारी आगवन, शंकरराव कोल्हे साखर कारखाना संचालक भास्कर भिंगारे,ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष जाधव व सर्व सदस्य , साई शक्ती इंग्लिश  मीडियम स्कूलचे प्राचार्य विजय जाधव तसेच करंजी गावच्या सर्व जेष्ठ श्रेष्ठ मित्र परिवार मार्गदर्शक आदीनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत