ऑनलाईन गुगलमीट द्वारे मातृदिन साजरा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ऑनलाईन गुगलमीट द्वारे मातृदिन साजरा

नेवासा(वेबटीम) ज्ञानज्योती समूहाच्या वतीने ९मे रोजी ऑनलाइन गुगलमिटद्वारे ज्ञानज्योती मातृदिन साजरा करण्यात आला.  कार्यक्रमास माननीय गटशिक्षण...

नेवासा(वेबटीम)

ज्ञानज्योती समूहाच्या वतीने ९मे रोजी ऑनलाइन गुगलमिटद्वारे ज्ञानज्योती मातृदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास माननीय गटशिक्षणाधिकारी सौ सुलोचना पटारे यांनी सर्व ज्ञानज्योतींना शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्ना बैरागी मॅडम यांनी केले . कविता , आई वरील गीत, चित्र , भेटकार्ड  या माध्यमातून आईला शुभेच्छा संदेश देण्यासाठी मंगल कोरडे, सुरेखा वाघमारे,साठे मॅडम, ताके हर्षला,रूपाली खेडकर, डाॅ वैशाली खेडकर,दाणे प्रमिला,बनकर मॅडम, सुनिता पवार ,शांता मरकड श्री रामदास दळवी यांनी आपल्या आईविषयीच्या  भावना व्यक्त केल्या. 

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मायलेकिंनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहुन कार्यक्रमाची उंची वाढवली व आपल्या आईसमोर भावना व्यक्त केल्या त्यात अवचरे मिनाक्षी व अवचरे पुष्पा  ,घोडके वृषाली व घोडके मिनाक्षी, गायकवाड सुरेखा व पुष्पा गायकवाड,झिंजुर्डे सुप्रिया व झिंजुर्डे स्वामिनी, पालवे प्रतिभा व पालवे गंगुबाई,बोलके दिपाली,बोलके मिराबाई व भार्गवी पुराणिक  या तीन पिढ्यांनी सहभागी होऊन भावना व्यक्त केल्या व आईस पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. 

सुरेखा मॅडमने सासुदेखील आई आहे हे अनुभव  सांगितले. मा गटशिक्षणाधिकारी पटारे मॅडम यांनी सर्व ज्ञानज्योतींना सहभागी होऊन मातृमय वातावरण निर्मिती केल्याने प्रत्येक रचनेत डोळ्यात पाणी आले ही भावना व्यक्त केल्या व आईच्या आठवणी सांगितल्या . शेवटी  दीपाली पुराणीक- बोलके यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत