देवळाली प्रवरा(वेबटीम) कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीणभागातील रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करुन आवश्यक ती मदत करुन त्यांना संसर्गमुक्त ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीणभागातील रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करुन आवश्यक ती मदत करुन त्यांना संसर्गमुक्त करण्यासाठी देवळाली प्रवरा मेडिकल टिम काम करत आहे.
या टीममध्ये दत्ता कडुपाटील,आप्पासाहेब ढुस,ऋषीकेश संसारे ,डाॅ सुनील कदम ,जगदीश ढुस, प्रशांत कराळे , निलेश लासुरकर ,अमजद इमानदार यांचा समावेश आहे.
वाढत्या संसर्गाने हतबल झालेल्या ग्रामीण भागातील जनतेला या कठीण काळात योग्य ते मार्गदर्शन व योग्य ती मदत मिळणे गरजेचे असताना कोरोनाबद्दलची अनाठायी भिती, खासगी खचीॅक उपाय यामुळे ग्रामीण भागातील जनता काही घाबरलेली व गोंधळून गेल्याचे चित्र होते. यासाठी त्यांना दिलासा देवुन सवोॅतोपरि मदत करण्यासाठी देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीम अहोरात्र मेहनत घेत आहे.
यामध्ये रुग्णांना बेड मिळवुन देणे.रेमडिसीव्हरसाठी शासन यंत्रणेकडे पाठपुरावा करणे.प्लाझमा उपलब्ध करुन देणे लसीकरण व चाचणीसाठी लोकांना प्रवृत्त करत त्यांना योग्य नियोजन करणे.विलगीकरण कक्षात लोकांना जाण्यास मदत करणे . विलगीकक्षात शुध्द पाण्यासाठी मशीन बसविणे.मनोरंजनासाठी टी व्ही तसेच औषधे .अंडी ,फळे सॅनेटायझर मास्क दानशूर लोकांकडुन मिळविली आहेत.
या कठीण काळात सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा व ज्यांना शक्य आहे त्यांना या टीमला यथायोग्य सहकार्य करावे असे टीमचे प्रमुख दत्ता कडुपाटील यांनी केले आहे. तसेच रात्री अपरात्री केव्हांहि काही मदत लागली तर तात्काळ टीममधील कोणत्याही सदस्यांस दुरध्वनी करावा.तत्पर सेवा पुरवली जाते.
या उपक्रमातून शेकडो रुग्णांना प्लाझमा रेमडिसीव्हर बेड मिळण्यास मदत झाली आहे. टीमच्या या कामाचे सर्वदुर कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत