रमजान ईदची नमाज घरी अदा करावी -पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रमजान ईदची नमाज घरी अदा करावी -पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके

श्रीरामपूर(वेबटीम) रमजान ईद सनाच्या पार्श्वभुमिवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे नुकतेच शहरातील मुस्लींम बांधवाची बैठक घेण्यात आली.क...

श्रीरामपूर(वेबटीम)

रमजान ईद सनाच्या पार्श्वभुमिवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे नुकतेच शहरातील मुस्लींम बांधवाची बैठक घेण्यात आली.कोरोना माहामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी देखील सर्व मुस्लीम बांधवानी ईदच्या दिवशी घरी राहुनच ईदची नमाज अदा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे झालेली बैठक मध्ये पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके  यांनी  मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत यावर्षी ही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढत असल्याने सर्व समाज बंधवांच्या हिताच्य दृष्टीने घरात बसुनच ईदची नमाज अदा करावी अशी विनंतीसह आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले.

   सदर झालेल्या बैठकीत मुस्लीम समाजाचे नगरसेवक,मुज्जफर शेख,मुक्तार शहा,कलिम कुरेशी,जेष्ठ कार्यकर्ते अहमदभाई जहांगिरदार,जामा मस्जिदचे ट्रस्टी शकुर ताजमोहंमद,सादीद मिर्जा,एजाज दारुवाला,रज्जाक पठाण,ॲड समिन बागवान,शहर काझी सय्यद अली,नजीर मुलानी,रियाज खान व इतर प्रतिष्ठीत नागरीक मिटींगवर उपस्थित होते.

दरम्यान उपस्थितांनी रमजान ईद सणाचे अनुषंगाने उपवास करीता लागणारे फ्रुटचे हातगाडी सायंकाळी सुरु ठेवावी. फ्रुट विक्री करणारे फिरते सुरु ठेवण्याबाबत सुचना केल्या.  मिटींगदरम्यान कोरोनाचा मोठया प्रमाणात असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता ईदच्या दिवशी घरीच नमाज अदा करुन ईदचा सन सर्व मुस्लींम बांधवांनी साजरा करावा.शासनाचे नियमांचे सर्वांनी पालन करावे आपल्याकडुन शासन नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत