देवळाली प्रवरा प्रतिनिधी नगरविकास विभागाच्या वैशिष्टपुर्ण योजने अंतर्गत खा.सदाशिव लोखंडे यांनी देवळाली प्रवरात 'योगाभवन...
देवळाली प्रवरा प्रतिनिधी
नगरविकास विभागाच्या वैशिष्टपुर्ण योजने अंतर्गत खा.सदाशिव लोखंडे यांनी देवळाली प्रवरात 'योगाभवन' बांधण्यासाठी 80 लाख रुपयाचा निधी मंजुर केल्याचे पञ देवळाली प्रवरा नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे व माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्याकडे सुपुर्त केले आहे.
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या डाँ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात छोटेखानी कार्यक्रमात खा.सदाशिव लोखंडे यांनी मंजुर निधीचे पञ सुपुर्त केले. यावेळी बोलताना खा.लोखंडे म्हणाले की,देवळाली प्रवरा गावाचे माझ्यावर प्रेम आहे.मी बिगर पैशाचा खासदार झालो आहे. देवळाली प्रवरा सारख्या सुसंस्कृत गावात 'योगाभवन' असावे यासाठी नगरविकास विभाच्या वैशिष्टपुर्ण योजनेतुन 80 लाख रुपये मंजुर करण्यात आले. मंजुर निधीचे पञ नगर पालिकेस देण्यात आले आहे. 'योगाभवनाचे' चांगले काम करा जेणे करुन लोकांच्या मनात ती इमारत भरली पाहिजे.त्यामुळे योगभवनात योगा करण्यासाठी संख्या वाढती राहिली पाहिजे.शिर्डी येथे जंबो कोविड सेंटर सुरु करण्यात येत आहे.जंबो कोविड सेंटर मुळे अनेकांच्या पोटात दुःखू लागले आहे.कोविड सेंटर मार्फत विनामुल्य उपचार करण्यात येणार आहे.प्लेगच्या साथीत साईबाबा रुग्णांची सेवा करत होते.आज संस्थेचे ट्रस्ट रुग्णांची सेवा करणार आहे.आसे खा. लोखंडे यांनी सांगितले.
माजी. आ.चंद्रशेखर कदम म्हणाले की, खासदार लोखंडे यांच्याकडे विकास कामासाठी निधी मागायला काहीच वाटत नाही, त्यास कारण की, लोखंडे साहेबांना खासदार म्हणण्यापेक्षा साहेब म्हणतो त्यात आपुलकी व जवळची भावना असते.'योगाभवना' 80 लाख रुपये निधी मंजुर केला. नावा रुपाला शोभेल असे योगाभवनाचे काम करा.1.50 लाखा पर्यंत कर्ज माफी दिली आहे,परंतू 1.50 पेक्षा अधिक कर्ज असणारे थकबाकीत गेले आहे.त्यांचे कर्ज माफ करावे. थकबाकीदारांना नविन कर्ज उपलब्ध करुन द्यावे.अशा अनेक मागण्या खा.लोखंडे यांच्याकडे माजी.आ.कदम यांनी केल्या.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम,उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे,अमोल कदम,भारतशेटे,सुनिता थोरात बाळासाहेब खुरुदल्, सुनिल कराळे,तुषार शेटे,बन्सी वाळके, सुरेश मोटे,सुनिल गोसावी आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत