उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रास अद्यावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रास अद्यावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

  राहुरी (वेबटीम ) :- १४ व्या वित्त आयोग यामधून जिल्हा परिषद अहमदनगर च्या माध्यमातून उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळालेल्या अद्यावत रुग्ण...

 राहुरी (वेबटीम) :-

१४ व्या वित्त आयोग यामधून जिल्हा परिषद अहमदनगर च्या माध्यमातून उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळालेल्या अद्यावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच ज्येष्ठ नेते ॲड सुभाष पाटील व जिल्हा परिषद सदस्या शशिकला ताई पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे. या परिसराला कोरोना महामारी च्या या परिस्थितीमध्ये या रुग्णवाहिके मुळे याचा रुग्णांना मोठा फायदा होणार असल्याने परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 याबाबत माहिती अशी की १४ व्या वित्त आयोग अंतर्गत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील उंबरे देवळाली प्रवरा मांजरी टाकळीमिया व गुहा या पाच ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रांना अद्यावत रुग्णवाहिका प्रदान करण्यात आलेल्या आहेत. उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णांच्या सेवेसाठी व सोयीसाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ शशिकला ताई पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता याचाच परिपाक म्हणून उंबरे आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रुग्णवाहिका प्राप्त झाली आहे तिचे लोकार्पण नुकतेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती व तालुक्याचे ज्येष्ठ नेते ऍड सुभाष पाटील जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्य सौ शशिकला ताई पाटील यांच्या शुभहस्ते व डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन उदयसिंह पाटील तालुका आरोग्य आधिकारी डाॅ. दिपाली गायकवाड वैदयकिय अधिकारी उंबरे डॉ. अविनाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. या रुग्णवाहिका मुळे परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून परिसरातील रुग्णांची सोय होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करून ती उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्या सौ शशिकला ताई पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. रिपोर्टींग अधिकारी किरण खेसम्हाळसकर औषध निर्माण अधिकारी संजय कपूर वाहन चालक जेम्स ससाणे हे देखील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत