सातारा संपुर्ण देशात कोरोना महामारी संकटाने थैमान घातले असताना जो-तो आपापल्या पद्धतीने मदत करून समाजाप्रती सेवा करत असताना पहावयास मिळत आहे....
सातारा
संपुर्ण देशात कोरोना महामारी संकटाने थैमान घातले असताना जो-तो आपापल्या पद्धतीने मदत करून समाजाप्रती सेवा करत असताना पहावयास मिळत आहे. पुण्यामध्ये अशीच सामाजिक बांधीलकी जोपासत श्री.सोमनाथ जालिंदर गुरव हे अनेकांना मदत कार्य करत आहेत.
ते मुळचे सातारा जिल्यातील रेठरे खुर्द(कराड) गावचे आहेत, पुण्यामध्ये व्यवसाय व कंपनी मध्ये कार्यरत आहेत, संबंध महाराष्ट्र भर त्यांचा मित्र परिवार आहे, ते *धरणग्रस्त सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे सातारा जिल्हा अध्यक्ष आहेत*, अध्यक्ष सोमनाथ गुरव यांनी कसलीही पर्वा न करता अंध, अपंग बांधव ,गरजु महिला व हातावर पोट असलेल्या गरिबांना घरपोहच अन्नदान पाकीट सुविधा पुरविली. तसेच अनेकांना सॅनेटायझर व मास्क पुरवठा तसेच रस्त्यावरील गरजूंना साड्या, कपडे व इतर उपयोगी वस्तू वाटप करून काळजी घेण्याचे आव्हान केले.
त्यांच्या सोबत सहकारी मित्र स्वप्निल जाधव, सय्याजी पवार, सागर यादव, जोतिराम भोसले, संभाजी कण्हेरकर हे दिखील या उपक्रमाची हिस्सा बनले आहेत.
लॉकडाऊन सुरू असल्याने हातावर पोट असलेल्या कुटुंबाचा जीवन मरणाचा प्रश्न गँभीर बनला असता सोमनाथ गुरव व सहकारी यांनी राबविलेल्या अन्नदान उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे व समाजातुन त्यांना मदतीचे हात पुढे येत आहेत, यांच्या समाजकार्यामुळे धरणग्रस्त सेवा संघाला बळकटी मिळत आहे. गुरव यांच्या समाजकार्याचे धरणग्रस्त सेवा संघ महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष अँड.सिंड्रेला टोनी परेराव राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी स्वागत करून भावी वाटचालिस शुभेच्छा व्यक्त केल्या.
रस्त्यावरचे कोणतेच लहान मुल व माता उपाशी झोपणार नाही या दृष्टीने सोमनाथ गुरव यांचे
पाऊल आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत