राहूरी(वेबटीम) दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून उद्या(11 मंगळवार)सकाळी सहा वाजता700 ...
राहूरी(वेबटीम)
दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून उद्या(11 मंगळवार)सकाळी सहा वाजता700 क्यूसेस शेतीसाठी पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार असून हे आवर्तन सुमारे 40 दिवस चालणार आहे. पाणी सोडल्याने सुमारे 30 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मुळा धरणात सध्या तेरा हजार 941 दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक असून त्यापैकी नऊ हजार 441 इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे .उजव्या कालव्याच्या आवर्तनतून सुमारे पाच हजार पाणीसाठा उपयोगात येणार आहे. मुळा धरण सलक तीन वर्षापासून ओवरफ्लो झाली आहे.
यंदा मुळा धरणात वाढीव पाणीसाठा दीड हजार दशलक्ष घनफूट शिल्लक राहणार आहे. त्याचा उपयोग पुढील हंगामासाठी करण्यात येणार असल्याची माहिती अण्णासाहेब आंधळे यांनी व्यक्त केली. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत