राहूरी तहसिल कार्यालयात वॉर रूम' सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहूरी तहसिल कार्यालयात वॉर रूम' सुरू

राहूरी(वेबटीम) कोरोनाच्या  चिंताजनक परिस्थितीत राहुरीतील जनतेला उपलब्ध बेड, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका इतर सुविधांबाबत त्वरित माहिती मिळावी या...

राहूरी(वेबटीम)


कोरोनाच्या  चिंताजनक परिस्थितीत राहुरीतील जनतेला उपलब्ध बेड, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका इतर सुविधांबाबत त्वरित माहिती मिळावी यासाठी 'वॉर रूम' ची संकल्पना काही तरुणांनी मांडली. या महत्वपूर्ण सूचनेचे स्वागत करत आज राहूरी येथे राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते वॉर रूमचे उद्घाटन संपन्न झाले.

या वॉर रूम मध्ये बेड/ऑक्सिजन बेड, रुग्णवाहिका, प्लाझ्मा सोबत हॉस्पिटलच्या बिलाचे ऑडिट याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन आणि योग्य दिशा दाखवली जाणार आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून सर्वच समस्या सुटणार नाहीत. मात्र गोंधलेल्या अवस्थेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना निश्चितच दिलासा मिळेल. अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लोकांना मदतीचा हात देण्याचे कार्य तरुण वर्गाने पुढाकार घेऊन केले त्याबद्दल ना.तनपुरे यांनी सर्वांचे आभार मानले.

वॉर रूमचा संपर्क क्रमांक - ०२४२६/२३२६६०  

८४३२२३७४७१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत