कोपरगाव/प्रतिनिधी गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संकटाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या कोरोनाचे संक्रमण शहरासह ग्रामीण भागात ...
कोपरगाव/प्रतिनिधी
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संकटाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या कोरोनाचे संक्रमण शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ धोरणांतर्गत कठोर निर्बंध लागू केले आहेत. यामुळे अनेकांचे व्यवसाय, उद्योग व रोजगार बुडाला असल्याने संकट टळल्यानंतर बँकांनी कर्ज वसुली करावी, अशी मागणी कोपरगाव शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना संकटाने जनता आधीच त्रस्त आहे. अनेकांचा रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यातच बँका सतत नोटीस व फोन करुन कर्ज भरण्यास सांगत आहे.
या सततच्या तगाद्यामुळे नागरिक चिंताग्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर बँकांनी कोरोना संकटाने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी संकट टळल्यानंतर कर्ज वसुली करावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मोरे यांनी केली आहे. या निवेदनावर मोरे यांसह गगन हाडा यांची स्वाक्षरी आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत