कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव विधानसभा मतदार संघात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोरोनाच्या महामारीत देखील विकासकामांसाठी कोट्...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव विधानसभा मतदार संघात आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोरोनाच्या महामारीत देखील विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी कोपरगाव येथे गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत पंचायत समिती अंतर्गत प्रस्तावित असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा त्यांनी आढावा घेतला. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये यासाठी कोपरगाव शहरासह तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे पावसाळ्याच्या आत पूर्ण झाली पाहिजे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देवून हि विकासकामे पूर्ण करून घ्यावीत. त्याबाबत संबंधित ठेकेदारास आदेश द्यावेत. दिलेल्या मुदतीत विकास कामे पूर्ण करतांना संबंधित ठेकेदाराकडून विकासकामांच्या गुणवत्तेबाबत तडजोड होता कामा नये. यासाठी सर्व विकासकामे गुणवत्तापूर्वक करून घ्यावीत. कोणत्याही विकासकामात हलगर्जीपणा आढळून आल्यास खपवून घेतला जाणार नाही अशा ईशारा आमदार आशुतोष काळे यांनी यावेळीसार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत