अखेर, 10 वीची परीक्षा रद्दचं ! शासनाचा मोठा निर्णय - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अखेर, 10 वीची परीक्षा रद्दचं ! शासनाचा मोठा निर्णय

 मुंबई :  वेबटीम      सध्या कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्...

 मुंबई :  वेबटीम     


सध्या कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा अखेर रद्दचं करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे आता 10 वीची परीक्षा रद्द होणार असून, 11 वी प्रेवशाबाबत लवकरच निर्देश दिले जाणार आहेत

     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा आयोजित करण्यात येते. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी परीक्षा माहे मे 2021 मध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित होते. तथापी, कोव्हिडं - 19 रोगाच्या पादृभावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे, राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेत समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षा संबंधित सर्व घटकांचे हीत लक्षात घेता, शासनाने मोठा निर्णय घेतला आहे, त्यानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यममक व उच्च माध्यममक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा रद्द करण्यात येत आहे.दरम्यान, या आदेशाने 10 वीची परीक्षा बाबत आता पडदा पडला असून, यावर्षी 10 विला असलेले सर्व विद्यार्थी बिनविरोध 11 वीला जाणार आहेत .

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत