परीचारीका दिनाच्या दिवशी परीचारीकेवरील अत्याचाराची घटना उघड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

परीचारीका दिनाच्या दिवशी परीचारीकेवरील अत्याचाराची घटना उघड

  राहुरी प्रतिनिधी  आज देशात परीचारक दिन साजरा होत असताना संगमनेर तालुक्यातील एका 26 वर्षीय परीचारीकेवर देवळाली प्रवरा ता.राहुरी येथील...

 राहुरी प्रतिनिधी

 आज देशात परीचारक दिन साजरा होत असताना संगमनेर तालुक्यातील एका 26 वर्षीय परीचारीकेवर देवळाली प्रवरा ता.राहुरी येथील फय्याज शेख याने त्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सलग अकरा महिने वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      संगमनेर तालुक्यात राहत असलेली एक २६ वर्षीय तरूणी अहमदनगर येथील एका मोठ्या रुग्णालयात परीचारीका (स्टाफ नर्स) म्हणून खाजगी नोकरी करत आहे. सध्या ती तरूणी अहमदनगर येथे त्या रुग्णालया समोरच रहावयास आहे. तिने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, १३ जून २०२० ते ७ मे २०२१ या दरम्यान आरोपी फय्याज असलम शेख राहणार देवळाली प्रवरा, तालूका राहुरी. याने फिर्यादी २६ वर्षीय तरूणीला राहुरी तालूक्यातील चिंचोली फाटा तसेच अहमदनगर येथील माळीवाडा परिसरातील यशोधन लॉज येथे घेऊन गेला. तसेच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार बलात्कार केलाय. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संगमनेर तालूक्यातील त्या तरूणीची राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथील फय्याज शेख याच्या बरोबर ओळख झाली होती. ओळखीमधून घनिष्ठ संबंध निर्माण झाले नंतर भेटीगाठी सुरू झाल्या. याच दरम्यान फय्याज शेख याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सुमारे एक वर्ष वारंवार बलात्कार केला. अशी माहीती फिर्यादीत त्या परीचारीकेने दिली आहे.

        आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरूणीने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसां समक्ष कथन केला.गेल्या पाच दिवसा पासुन ती परीचारीका गुन्हा दाखल करण्यासाठी राहुरी पोलिस ठाण्यात चकरा मारत आहे.अखेर सहाव्या दिवशी पोलीसांनी तिच्या फिर्यादीवरून पोलिसांत फय्याज असलम शेख याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत