चार ट्रक स्वस्त धान्य पकडले ; जिल्ह्यात उडाली खळबळ ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

चार ट्रक स्वस्त धान्य पकडले ; जिल्ह्यात उडाली खळबळ !

 अकोले : प्रतिनिधी    तालुक्यातील राजूर येथे पोलिसांनी चार ट्रक स्वस्त धान्य पकडले असून संशयास्पद हालचाली व कागदपत्रावर गोडाऊन किपरच्य...

 अकोले : प्रतिनिधी 


 
तालुक्यातील राजूर येथे पोलिसांनी चार ट्रक स्वस्त धान्य पकडले असून संशयास्पद हालचाली व कागदपत्रावर गोडाऊन किपरच्या सह्या  नाहीत ,तसेच या ट्रकचे क्रमांक एम एच १७ ऐवजी मुंबई पासिंग असल्याने राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक फौजदार नितीन खैरनार ,हेड कॉन्स्टेबल भडकमवार यांनी चार ट्रक ताब्यात घेऊन तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून घटनेचा तपशील दिला आहे


      याबाबत असे समजते कि , राजूर येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एम. एच ०४ ई . वाय . ५२९१ वरील चालक हौशीराम  देशमुख यांनी २१८ बॅग ५० किलोप्रमाणे धान्य ,एम एच १५ एफ . व्ही .९०५७ वरील चालक साई धुमाळ १४९ बॅग ५० किलोप्रमाणे ,एम एच १७ ए . जी . ३८८३ चालक योगेश धुमाळ २०६ बॅग ५० किलोप्रमाणे , एम  एच १७ टि २९०० चालक अशोक देशमुख २०३ बॅग ५० किलोप्रमाणे धान्य असलेल्या चार ट्रक संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. याबाबत तहसील पुरवठा विभागाकडे चौकशी केली असता, गाडे ट्रान्स्पोट कंपनीच्या ट्रक मधून दुसऱ्या टप्प्याचे  हे धान्य  पोहचविण्यासाठी एम एच १७ बीवाय ७२४३ १५ मेट्रिक टन , एम एच १७ टी २५९३, १२ मे . टन , एम एच १४ बिजी २३२५ २० मे , टन एम एच १४ ए एच ६९५९, २० मे . टन या व इतर दोन ट्रकला  अन्नधान्य  वाहतुकीसाठी परवानगी देण्यात यावी असे पत्र दिले होते.त्याप्रमाणे पुरवठा विभागाने कार्यवाही केली  होती. मग या दुसऱ्या ट्रकमधून का धान्य नेण्यात आले? . त्यात परमिटवर गोडावून किपर यांची सही नसल्याने मोठा संशय व्यक्त होत आहे .                                                                         सध्या कोरोनामुळे  आदिवासी भागातील जनतेला धान्य मिळत नसताना या धान्याचा परस्पर विक्रीचा संशय आल्याने राजूर पोलिसांनी या ट्रक ताब्यात घेऊन तपास  सुरु केला आहे .याबाबत तहसीलदार यांनाही पत्र देऊन मालाची तपासणी करून  पुढील कार्यवाहीचे आदेश व्हावेत असे कळविले आहे . 

    तालुक्यात स्वस्त धान्य पूर्णतः करणाऱ्या वाहनांवर हिरवा पट्टा  असावा , वितरण व्यवस्था असा बोर्ड असावा असे असतानाही हे नियम न पाळता मुंबई पासिंग च्या ट्रक का निवडला?  याबाबत तर संबंधित अधिकृत  पुरवठा धारक कोण ? याची चौकशी व्हावी अशी मागणी आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष विजय भांगरे यांनी केली आहे .

     तर माजी आमदार वैभव पिचड यांनीही याबाबत चौकशी होऊन गरीबाच्या ताटातील अन्न इतरत्र जात असेल तर चौकशी होणे आवश्यक आहे . राजूर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी तसेच सरपंच गणपत देशमुख , संतोष बनसोडे ,पांडुरंग खाडे , सुरेश भांगरे , आकाश देशमुख आदींनी चौकशीची मागणी केली आहे .



  जिल्हा पुरवठा विभागाने या अनागोंदी कारभारास आळा  घालावा .आज आदिवासी भागात खाण्यासाठी अन्न  मिळत नाही ,खावटी नाही रोजगार नाही. त्यात जर असे धान्य कोणतेही सरकारी निर्बंध न  पाळता अन्नधान्य नेले जात असेल तर ते सहन केले जाणार नाही.या कारवाई बाबत राजूर पोलिसांना धन्यवाद दिले पाहिजे .तर महसूल विभागाने कोणतेही राजकीय दडपण  झुगारून न्याय निवड करावा. नाही तर कुंपणाने च शेत खाल्ले असे म्हणावे लागेल . योग्य पद्धतीने तपास करून संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे .

वैभवराव पिचड

भाजप अनुसूचित जनजातीमोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत