अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने तीन कोवीड सेंटरला आर्थिक मदत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने तीन कोवीड सेंटरला आर्थिक मदत

  अकोले : प्रतिनिधी      समाजातील घटकांकडून उभे राहिलेल्या कोव्हीड सेंटरला मदत करण्याच्या दृष्टीने या संस्थेकडून अकोले येथील अगस्ती आश्...

 


अकोले : प्रतिनिधी 


    समाजातील घटकांकडून उभे राहिलेल्या कोव्हीड सेंटरला मदत करण्याच्या दृष्टीने या संस्थेकडून अकोले येथील अगस्ती आश्रम सेंटर ला 51हजार रुपये, सुगाव खुर्द कोव्हीड सेंटर ला 51 हजार रुपये  व धुमाळवाडी कोव्हिड सेंटर ला 25हजार रुपयांचे आर्थिक मदतीचे धनादेश  संस्थेचे अध्यक्ष जे.डी.आंबरे पा.खजिनदार एस.पी.देशमुख,उपप्राचार्य डॉ.एस.बी.ताकटे  यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. 
 

 

        अहमदनगर जिल्ह्यातील  अकोले तालुक्यातील एक अग्रगण्य व  मातृसंस्था असलेली शिक्षणसंस्था म्हणून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही संस्था आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही ते नेहमीच अग्रेसर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  अकोले तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या तालुक्यातील नागरिकांची काळजी वाढत आहे. त्यामुळे हा मदतीचा निर्णय घेण्यात आला.                                      यावेळी दवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड.के.डी.धुमाळ,मच्छीन्द्र धुमाळ,डॉ रवी गोर्डे,किशोर धुमाळ,आर.एम.धुमाळ,सचिन शेटे, महेश नवले,प्रदीप हासे,दत्ता नवले,सुभाष बगनर,बाळासाहेब आरोटे,संजय शेळके,डॉ.घोगरे, डॉ.श्याम शेटे  व इतर मान्यवर उपस्थित होते.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे व अकोले तालुका यांचे ऋणानुबंध संस्था  स्थापने पासून आहेत.एक एक रुपया चे योगदानातून उभ्या राहिलेली या संस्थेने आज उच्च शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहे .त्यामुळे सर्वांच्या त्या ऋणातून उतराई होणे व संकटकाळात सोबत  राहणे हे संस्थेचे  कर्तव्य समजतो, अशी भावना संस्थेचे अध्यक्ष जे.डी.आंबरे पा.यांनी व्यक्त केली.

 यावेळी जे.डी.आंबरे पाटील यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत