[अकोले : प्रतिनिधी राजूर पोलिसांनी 500 क्विंटल धान्य घेऊन जाणाऱ्या चार वाहनांना ताब्यात घेतल्यानंतर माजी आ वैभव पिचड यांनी तहसील आणि प...
[अकोले : प्रतिनिधी
राजूर पोलिसांनी 500 क्विंटल धान्य घेऊन जाणाऱ्या चार वाहनांना ताब्यात घेतल्यानंतर माजी आ वैभव पिचड यांनी तहसील आणि पुरवठा विभागात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून गोरगरिबांचे धान्य चोरणार्या चोरट्यांना जेलमध्ये टाकावे, अशी मागणी उचलून धरल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. पिचड म्हणाले,
पिचड म्हणाले, राजूर पोलिसांनी पकडलेले धान्य हे किती व कुठं चाललं होतं, याची पुरवठा अधिकाऱ्यांना व गोडाऊन किपरला माहिती नसल्याचे समोर आले आहे, वाहन चालकांकडे परमिट नव्हते, वाहनांवर कोणतेही पुरवठा विभागाचे बोर्ड नव्हते, शिवाय, नोंद वेगळ्या गाड्यांची व धान्य वेगळ्या गाड्यातून सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. मी याबाबत स्वतः कागदपत्र पाहिले असता पुरवठा विभागाकडे काहीही नोंद नसल्याचे दिसले. मी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे विचारणा केली असून, ते चौकशी करत आहेत, तहसीलदार हे जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून घटनेची माहिती देत आहेत, मात्र, या प्रकरणी तत्काळ चौकशी होऊन गोरगरीब लोकांचे धान्य चोरणार्यावर करवाई करून त्यांना जेलमध्ये टाका, अशी मागणी केली आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत