देवळाली प्रवरा(वेबटीम) राज्यशासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी लाँकडाऊन जाहिर केला. लाँकडाऊन जाहिर करताना काही नियमावली घालुन दिल्या....
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील राहुरी फँक्टरी सह शहरात सर्वच ठिकाणचे व्यवहार बंद दरवाजाआड चालूच आहे. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असा प्रकार सध्या लाँकडाऊन मध्ये घडत आहे. देवळाली प्रवरात सध्या काय सुरु आहे आणि काय बंद आहे. याचा आढावा घेतला असता अनेक दुकाने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सुरु आहेत.
*किराणा दुकान*
किराणा दुकानदार यांना अत्यावश्यक सेवेत असल्याने सकाळी 7 ते 11 यावेळेत सामाजिक अंतराचे पालन, मास्क,सँनिटायझर आदीअटींचे पालन करुन दुकान चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.परंतू सकाळी 11 नंतर देवळाली प्रवरा शहरातील शनि मंदीर व शिवाजी चौकातील प्रत्येकी एक दुकान बंद ठेवलेले दिसते.इतर किराणा दुकानदार माञ मागिल दरवाजाचा वापर करुन दिवसभर दुकाने चालूच असतात या दुकानदारांच्या म्हणण्या नुसार कामगारांना अवघ्या चार तासाची हजेरी देणे परवडत नसल्यामुळे मागिल दाराने दिवसभर किराणा दुकानदार दिवसभर चालूच असता.त्यातच किराणा दुकानदारांनी एकजुट करुन किराणा मालाचेरौरी भाव अव्वाच्या सव्वा भाव करुन ठेवले अहे.या दुकानदारांवर शासनाच्या पथकाचा कोणताही अंकुश नाही.
*जनरल स्टोअर हार्ड वेअर*
जनरल स्टोअर व हार्ड वेअर व्यावसायिकांनी नामी शक्कल लढवून शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू अत्यावश्यक सेवेत असल्याने बारदाना, कांदागोण्या, पानकागद, यासह शेतीपुरक वस्तू ठेवून त्या आडून जनरल स्टोअर व हार्ड वेअर मधील वस्तू विकण्यासाठी नामी शक्कल शोधली आहे.
*मटन मार्केट*
मटन,मासे,अंडे अन्य मांसाहर अत्यावश्यक मध्ये असल्याने सकाळी 7 ते 11 या वेळेत दुकाने चालू ठेवण्यास परवानगी आहे. माञ 11 नंतर हे दुकानदार दुकानाचे शटर खाली घेवून दुकाना समोर बसुन राहतात गिऱ्हाईक आल्यावर शटर वर करुन ग्राहकाचीसेवा केली जात आहे.तर शनिवार व रविवार विकऐंड असताना शटर बंद पण दुकान चालू अनेक दुकानदारांनी मागिल दरवाजा करुन घेतला आहे सर्रास मागिल दरवाजाचा वापर करुन गिऱ्हाईक केले जात आहे.शासनाचे नियम धाब्यावर बसवले आहे.
*पानटपरी वरील गुटखा मावा तेजित*
पान टपरी चालकांनी टपऱ्या बंद ठेवल्या असल्यातरी दैंनंदिन व्यवहार सुरळीत चालू आहे. देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरात अनेक ठिकाणी गुटखा व मावा विक्री जोरदारपणे सुरू आहे.गुटखा, मावा, गायछाप बिडी, सिगारेट आदींचे भाव प्रमाणे घेण्याऐवजी वाढीव दराने गिऱ्हाईकास दिला जात आहे.तलपीचे काम असल्याने गिऱ्हाईक निमुटपणे घेत आहे.पोलीस प्रशासन अथवा नगरपालिका पथक याकडे पाहून न पाहिल्यासारख करत आहे. सगळं विका पण आम्ही आलो की बाजूला जा असा सल्ला नगरपालिका पथकातील कर्मचाऱ्यांकडून गुटखा व मावा विक्री करणाऱ्यांना दिला जात असल्याची चर्चा आहे.
*दाढी- कटिंग दुकान*
शहरातील दाढी कटिंग दुकानात ग्राहकाला आतमध्ये घेऊन शटर बंद करुन पाच ते सहा ग्राहकांची दाढी-कटिंग केली जाते सगळ्यांची कटींग दाढी झाल्याशिवाय एका हि ग्राहकास बाहेर पडू दिले जात नाही. काही व्यावसायिकांनी तर सरळ ग्राहकांना घरी बोलावून घेवून कटींग दाढी केली जात आहे. प्रशासनाच्या नियमास पायंदळी तुडवत हा उद्योग सूरु आहे.नगरपालिकेने दोन दुकानावर कारवाई केली. मात्र सध्या पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.नगर पालिकेच्या पथकातील काही जण हितसंबध जोपसण्याचे प्रयत्न करीत असल्याने उघड्या डोळ्याने पाहुणही डोळे झाकुन घेत आहे.
*अवैध दारू विक्री जोमात*
राहूरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात अवैध दारू विक्री जोरदारपणे सुरू आहे.अनेक जण दारूचा साठा करून चढ्या भावाने दारू विक्री करत आहे.गावठी दारू अड्डे खुलेआम सुरू आहे.मात्र त्याकडे पोलीस प्रशासन कानाडोळा करत असल्याचे विदारक चित्र बघावयास मिळत आहे.
*विना परवाना औषध विक्री*
राहुरी फँक्टरी व देवळाली प्रवरात देशपातळीवर प्रख्यात बाबाचे कोरोनावरील औषध विक्रीचा व्यवसाय करीत असलेले औषध विक्री परवाना असल्या सारखे दिवसभर दुकान उघडे ठेवतात विकऐंड लाँकडाऊन सुद्धा या दुकानदारांना लागू नाही. बाबा देवचे ओषधा नावाखाली किराणा मालातील बिस्कीट पासुन ते साबनी पर्यंत विक्री करीत असताना पालिका पथकाच्या डोळ्यात धुळ फेक केली जात आहे. ओषध विक्रीचा कोणताही परवाना नसतानाही औषध विक्री करीत असल्याचे दाखवून औषध दुकाना प्रमाणे लाँकडाऊन मधील सुविधा घेतल्या जात आहे.राहुरी फँक्टरी व देवळाली प्रवरा येथील या दोन्हा व्यापाऱ्यां बरोबर नगल पालिकेच्या पथकाचे हितसंबध गुंतलेले आहे.त्यामुळे आज पर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. विना परवाना औषध विक्री पालिकेने कारवाई का केली नाही. हा संशोधनाचा विषय आहे.
*गँरेज,सायकल दुकाने, कुशन*
लाँकडाऊन काळात हि दुकाने पुर्णता बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही दररोज सकाळी नियमित प्रमाणे हि सर्व दुकाने उघडली जातात.काही दुकाने दिवसभर तर काही दुकाने दुपार पर्यंत चालू ठेवली जात असताना पालिका पथक डोळेझाक करीत आहे.
*भाजीपाला व फळ विक्रेत्यांना ञास*
लाँकडाऊन काळात घरोघरी जाऊन भाजीपाला विकण्याची परवानगी द्यायची. आणि दुसरीकडे हातगाडीवर भाजीपाला घरोघर जावून विक्री करीत आसतानाही भाजीपालासह फळ विक्रेत्यांना नगर पालिकेचे पथकाकडून ञास दिला जात असल्याचे फळ व भाजीपाला विक्रेते बोलत आहे. टरबुज घेणारे ते कर्मचारी कोण? असा प्रश्न पुढे येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत