अहमदनगर : प्रतिनिधी अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नव दाम्पत्याने पाठोपाठ आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जामखेड तालुक्यात घडल...
अहमदनगर : प्रतिनिधी
अवघ्या चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नव दाम्पत्याने पाठोपाठ आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जामखेड तालुक्यात घडली.
या घटनेची माहिती अशी की, जामखेड शहरात बीड रोडवर शिल्पा अजय जाधव (वय २८) या नवविवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना तिचा पती अजय कचरदास जाधव (वय ३२) याला समजली तेव्हा तो आपल्या पाण्याचे जार पुरविणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात होता. पत्नीच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यानेही तशाच पद्धतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. एकाच दिवशी तासाभराच्या अंतरातच दोघांनीही आपले जीवन संपविले, यामागील कारण स्पष्ट झाले नाही. अजय याने आपल्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी लिहून ठेवली आहे, मात्र प्रकरणाचा तपास सुरु आहे . या घटनेने खळबळ उडाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत