अकोले : प्रतिनिधी तालुक्यात सरकारचे,आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असून मृत्यूचा आकडा लपविला जात आहे .यावर आठ दिवसात नियंत्रण आले नाही तर उच्च ...
अकोले : प्रतिनिधी
तालुक्यात सरकारचे,आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असून मृत्यूचा आकडा लपविला जात आहे .यावर आठ दिवसात नियंत्रण आले नाही तर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सरकार, जिल्हा प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाईल, असे पेसा ग्रामपंचायत सरपंच परिषदेच्या बैठकीत इशारा देण्यात आला आहे .
आज राजूर येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेऊन राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे . अकोले तालुक्यात कोरोना च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मृत्यूचा दर वाढला असून सरकारी आकडा व प्रत्यक्षात आकडा यात मोठी तफावत आहे .तालुक्यातील आरोग्य यंत्रणा मेटाकुटीला आली असून आदिवासी भागात आरोग्य कर्मचारी नसल्याने जनतेला घरातच राहून आजाराचा सामना करण्यात येत आहे .
सुगाव येथील केंद्रात ऑक्सिजन बेड असून ही मृत्यू झाले आहेत. मग जिथे उपचारासाठी काहीच नाही त्या जनतेने काय करायचे ? आदिवासी विकास विभागाने केवळ घोषणा करून आदिवासी रुग्णासाठी इंजेक्शन व ऑक्सिजन बेड देण्याचे मान्य करूनही सरकारी यंत्रणा याबाबी कडे दुर्लक्ष करीत आहेत .तर केवळ एकच सरकारी कोरोना केंद्र खानापूर तालुक्यात आहे .तर अगस्ती कारखाना व माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अगस्ती मंदिरात एक तर शिक्षकांनी योगदान देऊन सुगाव येथे एक असे दोन काळजी व उपचार केंद्र असेल तरी केवळ एक डॉकटर हे तीन केंद्रावर उपचार करत आहे .
कर्मचारी अपुरे असल्याने उपचार योग्य पद्धतीने होण्यास अडथळे निर्माण होतात तर तालुक्यात समशेर पूर,राजूर, वारूंघुशी,या ठिकाणी माजी आमदार वैभव पिचड ,रावसाहेब वाकचौरे,सरपंच गणपत देशमुख यांनी कोरोना काळजी केंद्र उभारून लोकसहभागातून उभारून अनेक रुग्णांना दिलासा दिला आहे .
मात्र लोकप्रतिनिधी या केंद्रावर जाऊन स्वच्छता नसल्याची तक्रार तहसीलदार यांना करून जे चांगले काम करतात त्यांना तहसीलदार यांचे माध्यमातून आदेश करतात हे योग्य नाही .त्यापेक्षा आमदार लंके यांचा आदर्श घेऊन तालुक्यात सरकारी खर्चाने कोव्हिड केंद्र उभारून गरीब जनतेला दिलासा देणे आवश्यक आहे. मात्र तसे घडत नाही .आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात लोक आजारी असून आर्थिक स्थिती नसल्याने घरात राहूनच आजार अंगावर काढत आहे .आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे .तालुक्यात रेमडीसिवीर इंजेक्शन नाही .टेस्ट कीट नाही .ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाही.त्यामुळे लाखो रुपये खर्च करून तालुक्यातील रुग्ण संगमनेर,नाशिक,मुंबई येथे उपचारासाठी जात आहे . गरीब रुग्ण हाताला रोजगार नाही, खावटी नाही,स्वस्थ धान्य नाही,मोफत धान्य नाही .त्यात आजार आला तर पैसे आणायचे कुठुन हा प्रश्न उभा आहे .तालुका प्रशासन असमर्थ ठरत आहे त्यामुळे सरकारने लक्ष घालावे, असे अध्यक्ष चंद्रकांत गोंद के,सचिव पांडुरंग खाडे,गणपत देशमुख,सुरेश भांगरे आदींनी हा इशारा दिला .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत