कोपरगांव (वेबटीम) : - गेल्या काही दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यात सह इतर जिल्ह्यात आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या शैक्षणिक व्यवस्थापकांनी के...
कोपरगांव (वेबटीम) : -
गेल्या काही दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यात सह इतर जिल्ह्यात आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या शैक्षणिक व्यवस्थापकांनी केलेल्या पराक्रमा बाबत चर्चेचा विषय बनलेला असुन अद्याप ही कुठल्याही प्रकारची प्रशासनाकडून तसेच शैक्षणिक संकुलातून कारवाई न झाल्यामुळे आत्मा मालिक च्या शैक्षणिक संकुलाचे अध्यक्षयांच्यासह शैक्षणिक व्यवस्थापकावर त्वरीत गुन्हा दाखल करावा तसेच संस्थेच्या शैक्षणिक मान्यता रदद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी यांना पाठवावा अशी मागणी लोक स्वराज्य अंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अॕड नितीन पोळ व भुमीपुत्र फांउडेशनचे संस्थापक अध्यक्ष नीसार शेख यांनी निवदेनाव्दारे कोपरगांवचे तहसिलदार योगेश चंद्रे व गटशिक्षणअधिकारी यांच्या केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, शिक्षण संस्थेच्या मार्फत शिक्षक कर्मचारी यांच्या विचारांची देवाण - घेवाण करण्यासाठी संस्था प्रमुख यांच्या आदेशाने प्राचार्य नावाच्या व्हाॅटसअॕप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. या ग्रुपवर अनेक माहिला शिक्षक व कर्मचारी व वरिष्ठ पदाधिकारी देखील आहेत याबाबाबतची माहिती ग्रुप मधील सर्व सदस्यांना होती व आहे असे असतांना गु्रपमधील शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकर मलिक यांनी त्यांच्या मोबाईवरुन सदर प्राचार्य गु्रपवर अश्लील व्हिडीओ टाकुन महिला भगिनींना मानसिक त्रास दिला व लज्जा उत्पन्न होईल असे दृष्कृत्य केले आहे मात्र या बाबत संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली असता उलट या महिला शिक्षकांना कामावरून कमी करण्याची धमकी दिल्याची चर्चा देखील शैक्षणिक संकुलात आहे. शैक्षणिक संस्थेत उच्च शिक्षीत महिला सोबत झालेला प्रकार निदंनीय असुन या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेतचा प्रश्न निर्माण झाला आहे एका बाजुस शासन महिला सबलीकरण व सक्षमीकरण तसेच सुरक्षितेच्या गप्पा मारत असतांना उच्च शिक्षीत महिलांना शिक्षक व शिक्षण संस्थेकडून अशा प्रकारे असुरक्षित वागणुक देत असेल तर महिलांच्या हितासाठी शेकडो वर्षापासुन काय करवा त्या सामाजिक क्षेत्रातील महामानव यांचे विचारांना तिलांजली देण्यासारखे होणार आहे तसेच या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणा-या मुलींना कोणत्या प्रकारची वागणुक मिळत असेल याची कल्पना देखील करता येत नाही. महिला शिक्षीका व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सदर ग्रुप मधील त्या शैक्षणिक व्यवस्थापकावर त्वरीत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्या व्यवस्थापकास पाठीशी घालणा-या संस्था प्रमुखास गुन्हा दाखल करुन या संस्थेच्या शैक्षणिक मान्यता रदद करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी यांना पाठवावा अन्यथा या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इषारा देखील अॕड नितीन पोळ यांनी दिला आहे. या निवेदन प्रसंगी विनोद वाकळे, शरद त्रिभुवन, सोमनाथ म्हस्के, अनिल पगारे, सुनील बोराडे, माजीद पठाण, असीफ पठाण, लोकस्वराज्य अंदोलनचे तसेच भुमीपुत्र फांउडेषनचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत