राहुरी/(वेबटीम):- जिल्हा परिषदेच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील व्याजाचा पैसा हा जिल्हा परिषदेमधे गेल्या अनेक वर्षांपासून जमा होता.या ...
राहुरी/(वेबटीम):-
जिल्हा परिषदेच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील व्याजाचा पैसा हा जिल्हा परिषदेमधे गेल्या अनेक वर्षांपासून जमा होता.या निधीचे काय करायचे हे आत्तापर्यंत शासनानाकडुन मार्गदर्शन मिळाले नव्हते पण कोरोनाच्या या परीस्थितीत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री हसन मुस्रीफ,आरोग्य मंञी राजेश टोपे यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हासाठी रूग्णवाहिका मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला होता त्यानुसार आता ग्रामीण भागात देखील ह्या रूग्णवाहीका मिळाल्याने आरोग्य विषयीच्या कार्यात मोठी मदत होणार आहे.म्हणून ग्रामीण भागात मिळालेल्या या रूग्णवाहीकेने नागरीकांना आनंद झाला आहे असे गौरवोद्गार पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव यांनी काढले ते मांजरी येथे बोलत होते.
राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मांजरी आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळालेल्या रूग्णावाहिकेचे लाभधारक गांवामधील सरपंच,उपसरपंच, पोलिस पाटील यांच्या उपस्थित जिल्हा परिषद सदस्य महेश सुर्यवंशी यांच्या हस्ते पुजन करून लोकार्पण करण्यात आले.यावेळी वैद्यकिय अधिकारी मल्हारी कौतुके यांनी आरोग्य विषयी माहीती देऊन सविस्तर आढावा दिला.सोमवारी सकाळी आरोग्य केंद्राच्या प्रानंगणात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी आरडगाव चे सरपंच कर्णा जाधव, वळणचे सरपंच सुरेश मकासरे,पोलिस पाटील सोमनाथ डमाळे,सर्जेराव विटनोर, चेअरमन अशोक विटनोर,मानोरी पोलिस पाटील भाऊराव आढाव,शेनवडगाव सरपंच आप्पासाहेब जाधव,मालुंजे पोलिस पाटील सोळुंके,खुडसरगाव चे पोलिस पाटील दादासाहेब पवार ,वांजोळपोई सरपंच बाळासाहेब कोळपे,आण्णासाहेब विटनोर,कोंडीराम विटनोर,दत्ताञय बिडगर सर,गोरक विटनोर, भाऊसाहेब विटनोर,आशिष विटनोर,भीमराज विटनोर,काशिनाथ विटनोर,आशा गट प्रवर्तक गौरी पवार आदि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत