कोपरगाव(वेबटीम) गेले एक वर्षापासुन राज्यासह देशात कोरोना ने सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे अनेकांचे उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला आहे....
कोपरगाव(वेबटीम)
गेले एक वर्षापासुन राज्यासह देशात कोरोना ने सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे अनेकांचे उदरनिर्वाह प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना विरुध्द लढण्यासाठी प्रशासन लढत आहेत परंतु यासाठी लोकप्रतिनिधीचे देखील नियोजन महत्त्वाचे असते परंतु कोपरगांवचे लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी लक्ष न दिल्याने फोटोसेशन मध्ये धुंद झालेल्या लोकप्रतिनिधींच्या नियोजनशुन्य कारभारामुळे चक्क ज्येष्ठ नागरिकांना मध्यराञीच लसीकरण केंद्रावर रांगा लावावे लागतात हीच मोठी शोकांतिका असल्याचे प्रतिक्रिया कोपरगांव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी दिली आहे.
पहिली लाट दुसरी लाट जीवघेणी असल्याने प्रत्येक कुटुंबातील एक ना एक नागरिक भयभीत झाले आहेत. कोरोना बाबत फक्त लोकप्रतिनिधी घोषणा करुन जनतेची दिशाभुल करत आहेत जर केलेल्या घोषणांमध्ये वस्तुस्थिती असती तर आज ज्येष्ठ नागरिकांना मध्यराञी लसीकरण केंद्रावर जावे लागले नसते. आज प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्यांची एकदम बारकाईने लक्ष देवुन आरोग्याची काळजी घेत आहे. परंतु लोकप्रतिनिधी त्यांच्या खोडसळ पणा हा अंगात असल्याने त्यांनी कोरोना काळातही जनतेबरोबर राजकारण करणे सोडले नाही. त्यांच्या या नियोजनशुन्य कारभारामुळेच अनेक नागरिकांना जीम गमवावा लागला आहेत. आॕक्सीजन बेड, इंजेक्शन, रुग्णांसाठी लागणारे औषधे उपलब्ध करण्याचे नियोजन केले असते तर नागरिकांना उपचारासाठी तालुक्याबाहेर , जिल्हाबाहेर जावे लागले नसते. लसीकरण केंद्रावर भेट दिल्यावर केंद्रावर येणा-या जाणा-या नागरिकांची सुरक्षितता पूर्णतः वा-यावर सोडल्याचे विदारक चित्र बघायला मिळत आहे.
सामाजिक अंतर नियमाचा फज्जा लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांनी रांगा लावताना सामाजिक अंतर ठेवले आहे किंवा नाही, हे पाहण्याचे काम प्रशासनाचे आहे तितकेच जवाबदारी नागरिकांची देखील आहे. परंतु प्रशासनाकडुन कोणतेही नियोजन नाही यावरुन दिसुन येते अधिकारी, कर्मचारी टाळत असल्याचे किंवा कामकाजात व्यस्त करुन घेत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेची त्यांना कुठल्याही प्रकारची चिंता वाटत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. लस घेण्यासाठी नागरिक मध्यरात्रीपासुनच लांबच लांब रांगा लावतात. लसीकरण केंद्रावर कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्याने सामाजिक अंतर नियमाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रषासनाने योग्य तो नियोजन केले तर मध्यरात्री रांगा लागण्याचे काम राहणार नाही, ज्याचा वषीला तोच लसीला असल्याने पोलीस, पत्रकार, अधिकारी यांना देखील लस देण्यापासुन बाजुला ठेवत असल्याने यांनी देखील तीव्र नाराजी असल्याचे दिसुन येत असल्याचे निखाडे म्हणाले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत