कोपरगाव/प्रतिनिधी शहरातील डागा परिवाराच्यावतीने कोविड महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने स्व.संतोष डागा यांच्या प्रथम पुण्यस्म...
कोपरगाव/प्रतिनिधी
शहरातील डागा परिवाराच्यावतीने कोविड महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने स्व.संतोष डागा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी (ता.१३) नेहरु मार्केटच्या समोर रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यामध्ये ५२ दात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य निभावले.
सदर शिबिराचे उदघाटन कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, पालिकेचे गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजित शेख, रवींद्र पाठक, संजय वाणी, सुनील शिलेदार, अशोक डागा, अरुण डागा, दिलीप डागा, सुनील बोरा, कृष्णा आढाव, सोमेश्वर आढाव, नवाज कुरेशी, वाल्मिक लाहिरे, संदीप कपिले, अनुप डागा, प्रीतम डागा, पुष्पक डागा, अमोल डागा, रोशन डागा आदी उपस्थित होते.
नाशिक येथील समता रक्तपेढीच्या सहकार्याने शिबिर पार पडले. याबद्दल आमदार काळे यांनी डागा परिवाराचे कौतुक करून, कोरोनाच्या संकटात गरजूंना याचा नक्कीच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत