अकोले : प्रतिनिधी अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या प्रभारी कार्यकारी संचालक पदी मुख्य लेखापाल एकनाथराव शेळके यांची आज संचालक मंडळाने नि...
अकोले : प्रतिनिधी
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या प्रभारी कार्यकारी संचालक पदी मुख्य लेखापाल एकनाथराव शेळके यांची आज संचालक मंडळाने नियुक्ती केली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्करराव घुले यांनी अलीकडेच आपल्या कार्यकारी संचालक पदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर आज संचालक मंडळाने त्यांचा सदिच्छा समारंभ आयोजित केला होता.श्री घुले यांनी पाच वर्षे अतिशय चांगले काम केले.त्यांनी उसाचे नियोजन चांगले केल्याने या वर्षी उच्चांकी उसाचे गाळप केले असून साखर उतारा ही जिल्ह्यात सर्वाधिक आहे. श्री घुले हे विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे हजर होत आहे.त्यांच्या सदिच्छा कार्यक्रमानंतर याच वेळी श्री शेळके यांचेकडे प्रभारी कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.
श्री.शेळके हे अगस्ति कारखान्याच्या स्थापने पासून लेखापाल विभागात कार्यरत होते. सुरुवातीला लिपिक म्ह्णून त्यानंतर बोर्ड सचिव व मुख्य लेखापाल म्हणून ते काम पहात होते. अगस्ति पतसंस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून ही काही दिवस त्यांनी काम पाहिले.त्यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. ते या पदाला निश्चित न्याय देतील असा विश्वास संचालक मंडळासह सभासद,कर्मचारी,ऊसतोड ठेकेदार,मजूर,वाहतूकदार, ऊस उत्पादक यांना वाटत आहे.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वानी समाधान व्यक्त केले. यावेळी
माजी मंत्री ,कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष,माजीमंत्री मधुकरराव पिचड,उपाध्यक्ष सिताराम पाटील गायकर, संचालक माजी आमदार वैभवराव पिचड यांचेसह संचालक मंडळ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत