अकोले स्वस्त धान्य वाहतूक प्रकरणी चार जणांवर गुन्हा ; पिचडांच्या पाठपुराव्याला यश! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अकोले स्वस्त धान्य वाहतूक प्रकरणी चार जणांवर गुन्हा ; पिचडांच्या पाठपुराव्याला यश!

  अकोले : प्रतिनिधी  अकोले तालुक्यातील  राजुर पोलिसांनी संशयास्पद स्वस्त धान्य वाहतूक करणारी चार वाहने काल ताब्यात घेतले होती .दरम्यान तहसी...

 




अकोले : प्रतिनिधी 


अकोले तालुक्यातील  राजुर पोलिसांनी संशयास्पद स्वस्त धान्य वाहतूक करणारी चार वाहने काल ताब्यात घेतले होती .दरम्यान तहसीलदार  मुकेश कांबळे  यांच्याशी पत्रव्यवहार करुनही तब्बल चोवीस तासान त्यांचे कोणतेही उत्तर न आल्याने राजूर पोलिसांनी शासकीय योजनेतील जीवनावश्यक गहू व तांदूळ बेकायदेशीररित्या वाहतूक करताना  मिळून आले म्हणून चार जणाविरोधात अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियम 1955 चे कलम 3 (1),7 प्रमाणे गुन्हा दाखल करून जवळपास 53 लाखाचा ऐवज जप्त केला आहे.दरम्यान संगमनेर विभागाचे  पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी आज राजूर येथे भेट दिली व सबधितां वर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिली.
धान्य प्रकरणी कारवाईची मागणी करताना वैभवराव पिचड

          तालुक्यातील राजूर पोलिस ठाणे समोरच पोलिसांनी बुधवारी दुपारच्या सुमारास राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, सहायक फौजदार नितीन खैरनार, हेड कॉन्स्टेबल देविदास भडकवार यांनी पोलिस ठाण्या समोर या गाड्याची तपासणी करत असतानाच रेशनिंगचे धान्य भरलेले चार ट्रक तपासणी करुन ताब्यात घेतल्या होत्या.

       माजी आमदार वैभवराव पिचड व त्यांचे कार्यकर्ते यांनी महसुल व पोलिस यंत्रणेकडे पाठपुरावा करत चौकशी होऊन गरीबाच्या ताटातील अन्न इतरत्र जात असेल तर कारवाईची मागण केली होती. यादरम्यान स्वत माजी आमदार पिचड यांनी या प्रकरनाव पाठपुरावा केला व थेट जिल्हाधिकारी यांचे कडे कारवाईची मागणी केली. अखेर महसूल यंंत्रणा खडबडून जागी झाली . पोलिस. कॉ. विजय सदाशिव फटांगरे (वय- ३० )ता.अकोले यांनी राजूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्ह्यात वापरलेली वाहाने एम एच 04 ई वाय 5291, एम एच 15 9057 ,एम एच 17 एजी 3883, एम एच 17 टी 2900 तर यामधून मिळाला माल-15,40,500/रु. किमतीचे त्यात 2,07,000/-रु. किमतीच्या 50 किलो वजनाच्या 207 गहूच्या गोण्या प्रति किलो 20 रुपये प्रमाणे किंमत अंदाजे 1,33,500/-रु. किमतीच्या 50 किलो वजनाच्या 89 तांदळाच्या गोण्या प्रति किलो तीस रुपये प्रमाणे किंमत अंदाजे व 12,00,000/-रुपये किमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच 04ई वाय 5291 किंमत अंदाजे

,13,77,500/-रुपये किमतीचे त्यात 92000/-रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या 92 प्रति किलो 20 रुपये प्रमाणे किंमत अंदाजे 85,500/-रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या 57 तांदळाच्या गोण्या प्रति किलो तीस रुपये प्रमाणे किंमत अंदाजे व 12,00,000/-रुपये किमतीचा आयशर कंपनी चा टेम्पो एम एच 15 एफ यु 9057 किंमत अंदाजे

,14,53,000/-रु. किमतीचे त्यात1,30,000/-रु किंमतीच्या 50 किलो वजनाच्या 130 गहू प्रति किलो वीस रुपये प्रमाणे किंमत अंदाजे 1,23,000/-रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या 82 तांदळाच्या गोण्या प्रति किलो 30 रुपये प्रमाणे किंमत अंदाजे व 12,00,000/-रु किमतीचा आयशर कंपनी चा टेम्पो एम एच 17ए.जी. 3883 किंमत अंदाजे

व 12,42,500/-रुपये किमतीचे त्यात 1,24,000/-रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या 124 गहूच्या गोण्या प्रति किलो 20 रुपये प्रमाणे किंमत1,18,000/-रु. रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या 79 तांदळाच्या प्रति किलो 30 रुपये प्रमाणे किंमत अंदाजे व 10,00,000/-रु. किमतीचा आयशर कंपनी चा टेम्पो एमएच-17 टी.2900 किंमत अंदाजे

एकूण-56,13,500/-रु.किमतीचा माल  आरोपी  हौशीराम दिनकर देशमुख रा. केळुंगण ता. अकोले, साई संदेश धुमाळ रा. धुमाळवाडी ता.अकोले , योगेश राजेंद्र धुमाळ रा. अकोले व  अशोक हिरामण देशमुख  रा.केळुंगण ता अकोले यांनी वर नमूद शासकीय योजनेतील जीवनावश्यक गहू व तांदळाच्या गोण्या बेकायदेशीररित्या वाहतूक करताना मिळून आले. म्हणून अत्यावश्यक वस्तू कायदा अधिनियम 1955 चे कलम 3 (1),7 प्रमाणे फिर्याद  दाखल केली आहे.या प्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन पुढील तपास स.पो.नि.नरेंद्र साबळे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत