योग भवन व रस्त्यासाठी रु. 1 कोटी चा निधी: ,खा लोखंडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

योग भवन व रस्त्यासाठी रु. 1 कोटी चा निधी: ,खा लोखंडे

अकोले - प्रतिनिधी।    शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खात्याच्या वैशिष्ठ पूर्ण योजनेतून अकोले नगर  प...



अकोले - प्रतिनिधी।   


शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खात्याच्या वैशिष्ठ पूर्ण योजनेतून अकोले नगर  पंचायत योग भवनासाठी 80 लाख रुपये मंजूर झाले आहेत, तर प्रभाग १ मधील माळीझाप येथील रस्त्यासाठी नगरसेवक प्रमोद मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नातुन रु. २० लाख मंजुर झाले असून याबाबत खा. लोखंडे यांचे अभिनंदन होत आहे.
 


खा. लोखंडे यांनी नुकतीच अकोल्यात भेट देऊन मार्गदर्शन करतांना सांगितले की अकोले हा आदिवासी तालुका असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या जास्तीत जास्त योजना तालुक्यासाठी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. सध्या कोविड ची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अकोल्यात योग भवन व्हावे यासाठी 80 लाखाचा निधी मंजूर केला आहे. तसेच अकोल्यासाठी गार्डन व जॉगिंग ट्रॅक करण्यासाठी तसेच अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत अग्निशामक केंद्र यासाठी देखील संबंधीत खात्याशी मी पाठपुरावा करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली


यावेळी अकोले नगर पंचायत मध्ये तहसीलदार मुकेश कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम जगदाळे तसेच शिवसेना तालुका प्रमुख मच्छिन्द्र धुमाळ, असाका चे संचालक  महेश नवले, नगरसेवक प्रमोद मंडलीक, प्रदिप हासे, उपजिल्हाप्रमुख रामहरी तिकांडे, शहर प्रमुख नितीन नाईकवाडी, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदेश  एखंडे, तालुका प्रमुख महेश देशमुख, शिवसेना नेते विकास महाले, युवसेना उपतालुका प्रमुख राहुल लांडे , विभाग प्रमुख गणेश कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते. 


खासदार साहेबांनी सर्व कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्या उपस्थित कोरोना आढावा बैठक घेऊन नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले. तसेच सुगाव आणि अगस्ती आश्रम कोविड सेंटर ला भेट देऊन,  सेवा, सुविधा, औषधे तसेच समस्या सन्दर्भात योग्य त्या सुचना देऊन रुग्णांना औषधे योग्य वेळी पोहोचतिल अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत