राहुरी येथील सर्पमित्रांनी चार विषारी नागांना दिले जीवनदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी येथील सर्पमित्रांनी चार विषारी नागांना दिले जीवनदान

  राहुरी : प्रतिनिधी        राहुरी येथील सर्पमिञांनी दोन दिवसात चार विषारी नागांना पकडून निसर्गात  सोडून देत जीवदान दिले आहे. राहुरी येथ...

 

राहुरी : प्रतिनिधी 


      राहुरी येथील सर्पमिञांनी दोन दिवसात चार विषारी नागांना पकडून निसर्गात  सोडून देत जीवदान दिले आहे. राहुरी येथे दिनांक 12 मे रोजी सकाळी 10 च्या दरम्यान राहुरीमधील गुरुदत्त पेट शॉप चे मालक भावेश दाणे यांच्या वस्तीवर दोन मोठे साप खेळत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दाणे यांनी राहुरी शहरातील प्रसिद्ध सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना फोन वरून माहिती दिली असता कृष्णा पोपळघट त्यांचे सहकारी मुजीब देशमुख यांच्या सह घटनास्थळी गेले असता त्यांना दोन नाग जातींचे सर्प लाकडाखाली बसलेले आढळून आले त्या नंतर कृष्णा पोपळघट व त्यांचे सहकारी मुजीब देशमुख यांनी काही वेळातच दोनही नागांना पकडून आपल्याला ताब्यात घेतले.


त्याच दिवशी सायंकाळी बारागाव नांदूर येथील मुळा धरणाच्या बाजूला राहत असलेले राहुल घोडे यांनी देखील कृष्णा पोपळघट यांना आपल्याला घराजवळ दोन साप असल्याचे सांगितले व त्यांना पकडण्यासाठी बोलावले असता तिथे देखील दोन नाग जातींचे साप पकडण्यात आले. असे एकूण 4 नाग नंतर जंगलात सुखरूप सोडून देण्यात आले. या दिवसात नाग व धामण जातीच्या सर्पाचा मिलन काळ असल्याने अनेक ठिकाणी दोन दोन साप नजरेत पडतात.


आज पर्यंत पोपळघट यांनी हजारो सापाना पकडून निसर्गात सोडून दिले आहे. त्याची कल्पना वनविभागाला देखील असते. कोणत्याही प्रकारचा वन्यजीव जखमी अथवा मानवी वस्तीत आढळल्यास त्याला मारू नका फक्त आम्हाला फोन करा असे पोपळघट नेहमी सांगतात व त्याबद्दल प्रबोधन करतात.


त्यांच्या कामाची दखल मा. खासदार बापूसाहेब तनपुरे साहेब यांनी देखील घेतली असून त्यांनी देखील पोपळघट यांना काळजीपूर्वक काम करून बक्षीस  म्हणून सुरक्षा किट दिली आहे. तरी राहुरी तालुक्यात कोठेही एखादा वन्य जीव आढळल्यास त्याला कोणतीही इजा न करता 8055770892 किंवा 8975400262 या नंबर वर किंवा वनविभागाची हेल्पलाईन 1926 यावर फोन करून कल्पना द्यावी असे आवाहन पोपळघट व देशमुख यांनी नागरिकांना केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत