दहावीची परीक्षा शुल्क मागे करावे : देशमुख - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दहावीची परीक्षा शुल्क मागे करावे : देशमुख

 अकोले :  प्रतिनिधी

 अकोले :  प्रतिनिधी


दहावी  परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना त्वरित परत करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल देशमुख यांनी केली आहे.

         


राज्य सरकारने नुकताच १०वी (SSC) बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निमित्ताने पुढील दोन प्रमुख मागण्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत पाटील यांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत. या १०वी बोर्ड परीक्षेसाठी अंदाजे १७ लाख विद्यार्थी बसणार होते आणि त्यांच्याकडून प्रत्येकी अंदाजे रु.४१५/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यात आली आहे.या माध्यमातून एकत्रितपणे अंदाजे ६८ करोड़ पेक्षा जास्त रक्कम राज्य सरकार कड़े परीक्षा शुल्कापोटी जमा झाली आहे. जर सरकार परीक्षा घेणार नाही तर  विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क का परत केले जात नाही असा प्रश्न आज विद्यार्थी व पालक यांच्या मनात तयार झालेला आहे.

वास्तविक पहाता परीक्षा रद्द करण्याच्या निर्णया बरोबर परीक्षा शुल्क परत करण्याचाही निर्णय राज्य सरकारने करणे  अपेक्षीत होते. परंतु दुर्दैवाने तसे करण्यात आले नाही. विद्यार्थ्यांच्या या पैशामध्ये तरी सरकारने पारदर्शकता ठेवावी व सदर परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना त्वरीत परत करावे. १०वी परीक्षा रद्द केल्यावर आता १२वी ची प्रवेश प्रक्रीया कोणत्या निकषांच्या आधारे केली जाणार आहे या बाबतचे धोरण अजूनही राज्यसरकारने स्पष्टपणे जाहीर केलेले नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मनात प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. सदर विषयात सरकारने आता वेळ दवडता भूमीका त्वरीत स्पष्ट करावी. वरील दोन्ही विषयात सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा करावी अशी मागणी पत्र मुख्यमंत्री उध्दव  ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांना पाठविले आहे. या निवेदनावर भाजयुमो उत्तर जिल्हा सरचिटणीस सुनिल उगले, भाजयुमो चे सरचिटणीस सुशांत वाकचौरे, उपाध्यक्ष नामदेव निसाळ, मदन आंबरे,प्रवीण सहाणे,विजय पवार,शंभु नेहे,राहुल चव्हाण, शिवाजी पारासुर,श्रीकांत भुजबळ,शिवाजी उंबरे,गोकुळ वाघ,वाल्मिक देशमुख,वाल्मिक नवले,आदी   कार्यकर्तेच्या स्वाक्षरी आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत