राजूर : विलास तुपे सलून व व्यवसाय करण्यास अत्यावशक सेवा म्हणून परवानगी मिळवी म्हणून संजय पंडित, उपाध्यक्ष, राष्ट्रीय जनसेवा पक्ष ...
राजूर : विलास तुपे
सलून व व्यवसाय करण्यास अत्यावशक सेवा म्हणून परवानगी मिळवी म्हणून संजय पंडित, उपाध्यक्ष, राष्ट्रीय जनसेवा पक्ष यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ई-मेल द्वारे कळविले आहे.राज्यातील आमचा नाभिक समाज आर्थिक दृष्ट्या अतिशय मागासलेला आहे,उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन नसल्याने लॉक डाऊन दरम्यान आमच्या समाजाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे, आर्थिक अडचणींना कंटाळून आजवर आमच्या सत्तावीस बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत,सरकारने मात्र त्यांची अद्यापही कसलीच दखल घेतलेली नाही,तसेच राज्यातील तमाम सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायिक उत्पन्नच नसल्या कारणाने आज उपामारीला सामोरी जात आहेत,
घर भाडे,दुकान भाडे,विविध बँकांचे कर्ज,कौटुंबिक खर्च आणि वैद्यकीय खर्च यामुळे व्यवसायिक त्रस्त झाले आहेत,शासनास वारंवार विनंती करूनही अद्यापही कसलीच मदत मिळाली नाही,
महोदय, आम्ही आपणास कळवू इच्छितो की,सलून व्यवसाय हा अत्यावश्यक सेवा देणारा व्यवसाय आहे, लॉक डाऊन काळातही दशक्रिया,तेरावा यासारखे धार्मिक विधी आम्हाला नियमांच्या अधीन राहून करावेच लागतात, आमच्या व्यवसायिकांनी आजवर शासनाच्या सर्वच नियमांचे काटेकोर पालन केले आहेच,आजवर आमच्या व्यवसायातून कोरोणा संसर्गाची एकही घटना घडलेली नाही, व्यवसाय बंद असल्यामुळे विविवध ठिकाणी ग्राहकांची गैरसोय झाल्याने सेवा देण्यास जबरदस्ती केली जात आहे, म्हणूनच वरील सर्व बाबींचा आपण गांभीर्याने विचार करून आमच्या सलून आणि ब्युटी पार्लर व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन व्यवसाय सुरू करण्यास लवकरात लवकर परवानगी द्यावी सर्व समाज बांधव ची मागणी आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत