मवेशी केंद्रात लसीकरण कमी,मात्र बाहेरचं फायदा..! अकोले : प्रतिनिधी- मवेशी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या १९ गावात व...
मवेशी केंद्रात लसीकरण कमी,मात्र बाहेरचं फायदा..!
अकोले : प्रतिनिधी-
मवेशी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या १९ गावात व १३ ग्रामपंचायत असे एकवीस हजार लोकसंख्या पैकी केवळ १२०० व्यक्तींना लसीकरण झाले असून आदिवासी भागात आदिवासी लोकांमध्ये लसीकरनाविषयी गैरसमज आहेत, त्यांना लसीकरण करणे कसे योग्य याबाबत समुपदेशन करणे गरजेचे आहे.असे मत जि. प.गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केले.
आदिवासी भागात लसीकरण आदिवासी नागरिक करीत नाही मात्र इतर ठिकाणाहून आलेल्या व्यक्ती लसीकरण करून घेत आहे. याबाबत भाजपचे जिल्हा परिषद गट नेते जालिंदर वाकचौरे यांनी मवेशी केंद्रास भेट दिली असता त्यांनी कमी लसिकरणाबाबत इतकी उदासीनता का ? असे विचारले असता वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले की, आरोग्य कर्मचारी लसीकरण व ऑक्सिजन तपासणी साठी गेले असता स्थानिक आदिवासी आम्हाला लस नको , आम्ही लस घेतली तर आजारी पडू असे उत्तरे देऊन आरोग्य कर्मचारी यांना हाकलून देत आहे .मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून लसीकरण कमी का?असे विचारणा होत असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी वेळ आरोग्य विभागावार आली आहे .त्यामुळे नाईलाजास्तव लसीकरण संगमनेर ,अकोले येथील व्यक्तींना द्यावे लागते .त्यावरून स्थानिक नेत्यांकडून कान उघडणी होत असल्याने कधी एकदाचा हा कोरोणा जाईल असे मवेशी आरोग्य केंद्राची झाली आहे .
स्थानिक सरपंच याबाबत आदिवासी लोकांना लस घेण्यास प्रवृत्त केले किंवा समुपदेशन केले तर निश्चित लसीकरण वाढेल आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे डॉ.वाघ यांनी सांगितले .
आदिवासी भागातील पाचनई गावात ५ व्यक्ती कोरोना बाधित असून सावरकुठे येथील सरपंच बाधित होऊन मृत्यु झाला.मात्र त्यांचे कुटुंब लसी करण करण्यासाठी पुढे येत नाही. आदिवासी भागात लग्न मोठ्या प्रमाणात सुरू असून सामाजिक अंतर ठेवले जात नाही. स्थानिक ग्रामसेवक तलाठी अंगणवाडी सेविका,शिक्षक यांनी लक्ष देणे आवश्यक आहे .
तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोणा संकट आले असून आजपर्यंत दहा हजारपेक्षा अधिक व्यक्ती बाधित झाले आहे .मृत्यूची संख्या तीनशे पर्यंत गेली आहे मात्र हा सरकारी आकडा दिशाभूल करणारा आहे .तालुक्यात लोकसहभागातून कोव्हीड केअर केंद्र आहेत .लोकप्रतिनिधी यांनी अधिक लक्ष देणे आवश्यक आहे .पारनेरचे आमदार निलेश लंके झोकून देऊन काम करत असताना, तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे फक्त उद्घाटन करत आहे.सरकारी निधी तालुक्यात आला मात्र त्याचा ताळमेळ नाही. तहसीलदार याबाबत बोलत नाही -आदिवासी भागात लसीकरण होत नाही त्यासाठी अधिकारी,स्थानिक कार्यकर्त्यानी, नेत्यांनी समुपदेशन करण्याची गरज आहे जालिंदर वाकचौरे (जिप. भाजप गट नेते)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत