राहुरी/वेबटीम:- राहुरी मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील लोहसर ( पवळवाडी ) , कोल्हार क्र . 1 तसेच मिरी शंकरवाडी येथील पाझर तलाबांचे दुरु...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील लोहसर ( पवळवाडी ) , कोल्हार क्र . 1 तसेच मिरी शंकरवाडी येथील पाझर तलाबांचे दुरुस्ती साठी मृदु जलसंधारण विभागाने रु . 95 , लाख 45 हजारांचा निधी मंजुर झाल्याचे राज्याचे नगरविकास , उर्जा , राज्यमंत्री , ना . प्राजक्तदादा तनपुरे यांनी दिली . ना . तनपुरे पुढे म्हणाले की , मतदार संघातील पाथर्डी तालुक्यातील लोहसर , पवळवाडी येथील शेतक - यांसाठी महत्वपुर्ण अशा तलावाच्या दुरुस्तीसाठी रु . 32 लाख 85 हजार , कोल्हार तलावासाठी रु . 49 लाख 29 हजार व मिरी शंकरवाडी तलावासाठी रु . 13 लाख 31 हजार असा एकुण रु .95 लाख 45 हजार निधी मंजुर झालेला आहे . येथील तलाब हे 1972 सालापासुन चे असुन अद्यापपर्यंत कुठलाही निधी या तलावांच्या दुरुस्तीसाठी आलेला नव्हता या तलावांची अवस्था अतिशय बिकट झालेली होती पाण्याच्या गळतीचे प्रमाण अधिक होते पावसाळ्यातील पाणी साचुन गळतीमुळे तलाव लवकर कोरडे पडत होते . नामदार तनपुरे यांचेकडे येथील लाभधारक शेतक - यांनी तलाव दुरुस्तीची मागणी केलेली होती . या मागणीची गंभीरतेने दखल घेवुन अवघ्या 4 महिन्यातच ना . तनपुरे यांचे विशेष प्रयत्नातुन जलसंधारण विभागाने या तलावांचे दुरुस्तीकरीता निधी मंजुर झाल्याने या दुरुस्ती कामामुळे परीसरातील शेतक - यांचे क्षेत्र ओलीताखाली येण्यास मदत होणार असुन जनावरांचा पाण्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे . लोहसर ( पवळवाडी ) , कोल्हार क्र .1 , मिरी शंकरवाडी येथील लाभधारक शेतक - यांनी समाधान व्यक्त केले आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत