कोपरगाव/प्रतिनिधी शहरातील ओमनगर येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आठ इंच करावी, अशी मागणी कोपरगाव शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावत...
कोपरगाव/प्रतिनिधी
शहरातील ओमनगर येथील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आठ इंच करावी, अशी मागणी कोपरगाव शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत नुकतेच पालिका उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात युवक राष्ट्रवादी काँगे्रसने म्हटले आहे की, ओमनगर भागासाठी सन 1998 मध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करण्यात आलेली आहे. त्यावेळी येथील घराची संख्या अत्यंत कमी होती. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत होत होता. मात्र आज 25 वर्षांनंतर या परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वी 30 नळ जोडणी असणार्या ओमनगरला आता सुमारे 300 नळजोडण्या आहेत. परंतु, पाईपलाईन 4 इंची असल्याने महिलांना नाहक त्रास होत आहे. त्यासाठी पालिकेने ही पाईपलाईन आठ इंची करावी.
अशी मागणी राजेंद्र नानकर, दिगंबर राणे, उल्हास सोनवणे, सुरेश लाड, नवाज कुरेशी, हृषीकेश खैरनार, सागर जाधव, उमेश महाजन, हिरामण महाजन, दत्तात्रय वाघ, संपत कापसे, कांतीलाल देवकर, संदीप कपिले आदिंनी केली आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत