मानोरीतील आरोग्य सेवकासह अधिकारीही अडचणीत,आरोग्य विभागाची कारणे दाखवा नोटीस! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मानोरीतील आरोग्य सेवकासह अधिकारीही अडचणीत,आरोग्य विभागाची कारणे दाखवा नोटीस!

 

 




राहुरी/गोविंद फुणगे 

            मानोरी (ता.राहुरी)येथील आरोग्य सेवकाच्या मनमानी कारभाराने आता येथील अधिकारी अन् आरोग्य सेविका देखील  अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.सेवकाने केलेल्या कारनाम्याची जिल्हा आरोग्य विभागाने दखल घेतली असुन त्या उर्मट आरोग्य सेवकासह आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली जानार आहे?

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासणाने प्रतेक आरोग्य केंद्राला कोविड चाचणी करण्याचे उदिष्ट दिले आहे.माञ याच दरम्यान येथील नागरीक कोविड चाचणी करण्यासाठी मानोरी आरोग्य केंद्रात आले असता येथील आरोग्य सेवक मनमानी करून नागरीकांना उडवाउडवीची उत्तरे देतो.एक वेळी २० किंवा ४० व्यक्ती आल्यावरच चाचणी करायला परवडते अस् म्हणत नागरीकांना तासनतास ताटकळत ठेवले जाते . नव्हे नव्हे तर कधी चाचणी किट तर कधी पिपी किट शिल्लक नाही किंवा वरीष्ठ अधिकारी हजर नाहीत अशी बेताल उत्तरे देऊन नागरीकांना वेढीस धरत असल्याची गावात चर्चा आहे.तसा अनुभव देखील येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह व्यापारी आणि नागरीकांना देआ आला आहे.त्याच्या याच कारनाम्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्याने आता त्या आरोग्य सेवकासह येथील आरोग्य अधिकारी आणि आरोग्य सेविका अडचणीत सापडल्या आहेत.त्यांच्या पाठीमागे आता चौकशीची ससेमिरा लागली आहे.स्थानिक पदाधिका-यांसह वरीष्ठांनी त्यांना जाब विचारला असुन त्यांना आता सदर वृत्ताबाबद आरोग्य विभागाला लेखी खुलासा पाठवावा लागणार आहे.आता त्या उर्मट सेवकावर काय कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत