दिवसा घरफोडी करणारा आरोपी मुद्देमाला सह जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दिवसा घरफोडी करणारा आरोपी मुद्देमाला सह जेरबंद

राहुरी/वेबटीम:-   राहुरी तालुक्यातील कुरणवाडी मध्ये दिवसा घरफोडी करणारा आरोपी राहुरी पोलिसांनी पकडला असून त्याच्याकडून अंदाजे ५५ हजार रूपये ...

राहुरी/वेबटीम:-

  राहुरी तालुक्यातील कुरणवाडी मध्ये दिवसा घरफोडी करणारा आरोपी राहुरी पोलिसांनी पकडला असून त्याच्याकडून अंदाजे ५५ हजार रूपये किमतीची मोहनमाळ पोलिसांनी हस्तगत केली असून ती मुळ मालकाला परत करण्यात आली आहे. 

 कुरणवाडी(ता.राहुरी) येथे ७ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी काशिनाथ भागवत चव्हाण, राहणार कुरणवाडी  यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या राहत्या घरातून दहा ग्रॅम वजनाची मोहनमाळ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.संजय जाधव यांनी यातील घरफोडी करणाऱ्या आरोपी संजय उर्फ संतोष गोरख बर्डे( वय ३५), जिजाबाई संजय उर्फ संतोष बर्डे( वय ३२), दोघे राहणार कुरणवाडी यांना पोलिसांनी अटक केली असुन त्यांच्याकडून गुन्ह्यातील दहा ग्रॅम वजनाची अंदाजे ५५ हजार रूपयांची सोन्याची मोहनमाळ  हस्तगत करून ती मूळ मालकास परत करण्यात आली आहे. आपली चोरी गेलेली सोन्याची मोहनमाळ राहुरी पोलिसांनी परत मिळवुन दिल्याने फिर्यादी यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यासह राहुरी पोलिसांचे आभार व्यक्त केले.

     सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली काळे,  डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक,पोकाॅ. नंदकुमार दुधाळसह ,पोना.संजयकुमार जाधव संजय कारेगावकर, भगवान थोरात यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत