धक्कादायक ! आई पाठोपाठ ९ व्या दिवशी मुलीचाही कोरोनाने मृत्यू, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धक्कादायक ! आई पाठोपाठ ९ व्या दिवशी मुलीचाही कोरोनाने मृत्यू, महिला पत्रकाराचा दुर्दैवी अंत

अहमदनगर/वेबटीम:- आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीने देखील या जगाचा निरोप घेतला. आता आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची ...

अहमदनगर/वेबटीम:-


आईच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीने देखील या जगाचा निरोप घेतला. आता आई आणि मुलीचा एकत्रित दशक्रिया विधी करण्याची दुःखद वेळ अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले  येथील शिंदे कुटुबियांवर आली आहे. सुकृता हिने पत्रकारीतेमध्ये पदविका प्राप्त केली होती. अकोले तालुक्यातील ही पहिली महिला पत्रकार आज जग सोडून निघून गेली.

अकोले महाविद्यालयातील सेवा निवृत्त उपप्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे  यांची ज्येष्ठ कन्या सुकृता हिचे आज पहाटे कोरोनामुळे उपचारादरम्यान निधन झाले. आई पाठोपाठ मुलीचीही कोरोना विरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही आठ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. माय-लेकीचा पाठोपाठ झालेल्या निधनामुळे अकोलेकर सुन्न  झाले आहेत. तिच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावून गेली.

पत्रकारीता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अनेक जवळच्या लोकांचे कोरोनामुळे  निधन झाले. त्यातील एक म्हणजे सुकृता शिंदे. कोरोनाशी झुंज देत असतांनाच ती हे जग सोडून गेली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत